तरुण भारत

शास्त्रीनगर नाल्यातील गाळ काढल्याने समाधान

बेळगाव : शास्त्रीनगर भागातील गणेश मंदिराच्या शेजारी असलेल्या नाल्यात अलीकडे जलपर्णी भरपूर वाढली आहे. त्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यास अडथळा होऊन सायंकाळी दुर्गंधी सुटून डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात झाली. त्यामुळे शास्त्रीनगर व हुलबत्ते कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता.

याचे गांभीर्य ओळखून गणेश मंदिर मंडळातील श्रीकांत देसाई, अरुण कामुले, प्रकाश नेतलकर, उदय अणवेकर यांनी ही बाब राहुल पाटील यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर पाटील यांनी मनपा आरोग्य विभागाचे डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण विभागाचे आदिल खान व महांतेश नरसन्नावर यांच्याशी संपर्क साधून वरील माहिती दिली.

Advertisements

 त्यावेळी त्या अधिकाऱयांनी पाहणी करून ताबडतोब नाल्यातील गाळ व जलपर्णी काढण्याचे आदेश पथकाला दिले. आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले, मुकादम सचिन देमट्टी, विजय जाधव, ईसय्या व जेसीबी चालक अकबर काझी यांनी लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवली.

नाल्यातील पूर्ण गाळ काढा

स्वच्छता मोहिमेला महांतेश जिगजिनी, राजशेखर जिगजिनी, सुरेश पाटील, प्रकाश तेरगांवकर, सिद्धाप्पा मोदगेकर, रंगनाथ सुंकसाळकर, अवधूत पाटील, मळीक, ओगले गुरूजी, अभिषेक बोंदे, वाचमन इराप्पा यांची मदत झाली. येणाऱया काळात नाल्यातील पूर्ण गाळ काढून त्याचे पक्के बांधकाम करावे असे आवाहन केले.

Related Stories

जांबोटीतील फोटोग्राफरचा भीषण खून

Patil_p

बेळगाव अग्निशमन दलातर्फे केएसआरपी जवानांना प्रशिक्षण

Omkar B

संकेश्वरच्या नगराध्यक्षपदी सीमा हतनुरी

Patil_p

स्मार्ट बसथांबे अडकले अस्वच्छतेच्या विळख्यात

Patil_p

एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ

Rohan_P

कोल्हापूर-सौंदत्ती नवीन रेल्वेमार्ग करावा

Omkar B
error: Content is protected !!