तरुण भारत

अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलीवूड मधील आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपली पत्नी आणि सासूमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.आत्महत्या करण्याआधी त्याने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या परिजनांसोबत जवळच्यांना माहिती दिली.


संदीप गोरेगावमध्ये राहायचा. त्याने आपल्या सासू आणि पत्नीला आपल्या मृत्यूस जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘आता जगण्याची इच्छा नाही.आयुष्यात खूप आनंद आणि दुःख पाहीले. प्रत्येक समस्येचा सामना केला. परंतु आज मी ज्या आघातातून जात आहे, ते सहन करण्याच्या पलीकडे आहे. 
मला माहित आहे की, आत्महत्या ही भ्याडपणा आहे. पण जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही तसे आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई वीणू शर्मा ज्यांना समजले नाही किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझी पत्नी जास्त भडकू स्वभावाची आहे. तिचे व्यक्तीमत्व वेगळे आहे.


‘मी खूप आधी आत्महत्या केली असती, परंतु मी आणखी काही काळ थांबलो. मला वाटले की परिस्थिती सुधारेल पण तसे झाले नाही. मी कुठे जाऊ शकतं नाही. मी उचललेल्या पाऊलाचा काय परिणाम होईल ? हे मला नाही माहीत. मी नरक यातनेतून जात आहे. माझी विनंती आहे की, मी गेल्यानंतर कांचनला (त्याच्या पत्नीला) काहीही बोलू नये, परंतु तिच्यावर उपचार करा.’


आत्महत्येचा तीन तास आधी त्याने हा व्हिडीओ बनवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला ? हे समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालची वाट पाहत असल्याचे पोलीस म्हणाले. 


दरम्यान, संदीप नाहरने सुशांत सिह राजपूतचा सिनेमा ‘MS Dhoni: The Untold Story’ तसेच अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ मध्ये देखील काम केले होते. 

Related Stories

उत्तराखंड : 50 हजार अंगणवाडी आणि आशा ताईंना राखी पौर्णिमेची भेट

pradnya p

श्रीलंकेतील तेल टॅंकर ‘एमटी न्यू डायमंड’ ला लागली भीषण आग

pradnya p

‘टेनेट’, ‘मा रैने ब्लॅक बॉटम’चा वरचष्मा

Patil_p

विठोबाच्या मूर्तीस लवकरच वज्रलेप

Shankar_P

अयोध्येत कोरोना लस घेतलेल्या 7 महिला कॉन्स्टेबलची प्रकृती बिघडली

datta jadhav

किम जोंग उन यांची प्रकृती खालावली, शस्त्रक्रियेनंतर धोका वाढला

prashant_c
error: Content is protected !!