तरुण भारत

मराठी साहित्यामध्ये स्त्री आत्मचरित्रांची मोठी भर

मंथन महिला साहित्य संमेलनामध्ये पत्रकार मनीषा सुभेदार यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मराठी साहित्यामध्ये स्त्रीआत्मचरित्रांनी मोठी भर घातली आहे. लेखिकांनी भोगलेले भोग, त्यातून आलेली कटुता किंवा परिस्थितीचा मौन स्वीकार आता पुसला जायला हवा आणि कर्तृत्ववान स्त्रियांच्या आत्मचरित्रांची संख्या वाढायला हवी, असे मत पत्रकार मनीषा सुभेदार यांनी व्यक्त केले.

 मंथन साहित्य संमेलनामध्ये ‘स्मरणगाथा’ या दुसऱया सत्रामध्ये शीतल बडमंजी यांनी संमिधा या साधना आमटे यांच्या व आरती आपटे यांनी सई परांजपे यांच्या सय पुस्तकाचा परिचय करून दिला. या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून मनीषा सुभेदार बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, जवळजवळ 175 हून अधिक स्त्राr आत्मचरित्रे आहेत. परंतु प्रारंभीच्या काळी जे असेल त्याचा मूक स्वीकार पहायला मिळतो. पतीच्या चुकांना किंवा वर्तनाला त्यांचे संस्कार किंवा परिस्थिती कारणीभूत आहे, असेच लेखिकांना वाटते. पण नंतर मात्र स्वतंत्र व्यक्ती म्हणून पुरुषाच्या वर्तनाचे किंवा स्वभावाचे दोष आत्मचरित्रामध्ये टिपले गेलेले आहेत, असे त्या म्हणाल्या.

राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे परखड चित्रण ‘बंध, अनुबंध’मध्ये दिसते. सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्यास समाज परिवर्तनाचे काम थांबू शकते, हा महत्त्वाचा संदेश हे आत्मचरित्र देते. बेबी कांबळे यांच्या जीणं आमुचं हे आत्मचरित्र वाचताना स्त्रियांनी काय काय भोगले आहे, हे वाचून शहारे येतात. पण आपली दुःखे सुद्धा छोटी वाटू लागतात. तुलनेने ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मचरित्र प्रुरतेला सामोरे जावूनही रुजूपणाने कोणालाही दोषी न ठरविता व्यक्त झाले आहे. फक्त गाजलेल्या आत्मचरित्रांची चर्चा न करता महिलांच्या आत्मचरित्रांचे वाचन व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरती आपटे यांनी, सय हे पुस्तक म्हणजे एक कलाप्रवास आहे. अनेक रंजक घटना सई परांजपे यांनी मांडल्या आहेत. एका गोष्टीचा कंटाळा आला तर सतत नवनवीन गोष्टी करून पाहण्याची सई परांजपे यांची वृत्ती प्रेरणादायी आहे, असे सांगितले. शीतल बडमंजी म्हणाल्या, बाबा आमटे यांच्या समवेत संसार करणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु साधना आमटे यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्या वादळी आयुष्यात साधना आमटे या झुळूक असावी याप्रमाणे आल्या, असे सांगितले. या सत्राचे संचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. संमेलनाध्यक्षा डॉ. संध्या देशपांडे यांनी वक्त्यांचा सत्कार  केला.

Related Stories

समर्थनगरील ब्रम्हदेव मंदिराचा जीर्णोद्धार

Amit Kulkarni

बालचमूंना किल्ले साकारण्याचे वेध

Amit Kulkarni

राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सुमारे 300 कोटीची उलाढाल ठप्प

Amit Kulkarni

सुरक्षेच्यादृष्टीने कामांच्या ठिकाणी लावल्या रिबन्स

Omkar B

केएलई एमबीएतर्फे मानवतावादी दिन साजरा

Amit Kulkarni

नाल्याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!