तरुण भारत

शनि मंदिरसमोर वाहतूक कोंडी

परिवहन मंडळाच्या बसेसमुळे वाहतूक कोंडीत भर : अधिकाऱयांच्या समन्वयाअभावी अयोग्य नियोजनाचा फटका

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

 शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा संपता संपेना झाला आहे. शनि मंदिर परिसरात दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने येथे ‘ट्राफिक जंक्शन’ निर्माण झाले आहे. या ठिकाणी रहदारी पोलिसाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांना तसेच अवजड वाहनांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कपिलेश्वर उड्डाणपुलाकडून येणारी वाहने आणि पाटील गल्लीतील ये-जा करणाऱया वाहनांमुळे शनि मंदिरसमोर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ठिकाणी नेहमी होणाऱया वाहतूक कोंडीमुळे काही दिवस रहदारी पोलीस नियुक्त करण्यात आले होते. पण अलीकडे येथे रहदारी पोलीस नसल्याने रहदारीवर नियंत्रण राहिले नाही. सर्वच वाहनधारक पुढे जाण्यासाठी धावपळ करीत असतात. यामुळे शनि मंदिरसमोर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

उड्डाणपुलाच्या उभारणीपूर्वीच या ठिकाणी निर्माण होणाऱया समस्येबाबत विचार करणे गरजेचे होते. पण अधिकाऱयांच्या समन्वयाअभावी आणि अयोग्य नियोजनामुळे शनि मंदिर परिसर ट्राफिक जंक्शनचे पेंद्र बनले आहे. पण याचा फटका शहरवासीय आणि परिसरातील व्यावसायिकांना बसत आहे. शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक विविध मार्गांनी वळविण्यात आली आहे. परिणामी पाटील गल्लीतील रस्त्यावर देखील वाहतुकीचा ताण वाढला आहे.

बसेसमुळे कोंडीत भर

शहरामधून शहापूर परिसरात जाणाऱया आणि दक्षिण भागातून शहरात येणाऱया वाहनधारकांची गर्दी कपिलेश्वर उड्डाणपुलावर होते. त्यामुळे पाटील गल्ली आणि कपिलेश्वर उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱया वाहनांमुळे शनि मंदिरसमोर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशातच आता दक्षिण भागातील बसेस पाटील गल्ली मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकातून निघणाऱया बस फोर्ट रोडमार्गे पाटील गल्लीतून रेल्वे स्टेशनकडे जात आहेत. त्यामुळे या बसेसची गर्दी पाटील गल्ली मार्गावर वाढली आहे. परिणामी शनिमंदिर समोरील वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली आहे.

पोलीस नियुक्तीची गरज

या ठिकाणी रहदारी पोलीस नसल्याने दररोज वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. अवजड वाहने आणि बस बाहेर पडण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील समस्येचा विचार करून शनि मंदिरसमोर कायमस्वरुपी रहदारी पोलीस नियुक्त करण्याची गरज आहे.

Related Stories

1,689 उमेदवारांची टीईटी परीक्षेला दांडी

Patil_p

‘ते’ गवळी कुटुंबीय अद्याप भरपाईपासून वंचित

Amit Kulkarni

नाथ पै चौकात पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

Amit Kulkarni

शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये वृक्षारोपण

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीमुळे सहय़ादीनगरचा रस्ता अरुंद

Amit Kulkarni

32 मण सुवर्णसिंहासनासाठी निधी सुपूर्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!