तरुण भारत

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने ‘फसविण्याचे अड्डे’

बेळगावात कार्यालयांवर छापे : युवकाला अटक, 315 पासपोर्ट, रोकड जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

परदेशात नोकरी देण्याचे सांगून बेरोजगारांना फसविणाऱया महाभागांनी बेळगाव परिसरात आपले अनेक अड्डे थाटले आहेत. बेळगाव पोलिसांनी सोमवारी अशा अड्डय़ांवर कारवाई केली असून या प्रकरणी दरबार गल्ली व शेट्टी गल्ली येथील दोन कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. या कारवाईत पासपोर्ट, आधारकार्ड, मोबाईल संच, रोकड जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी रात्री या संबंधीची माहिती दिली. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी दरबार गल्ली येथील ट्रवलवर्ड (जॉब कन्सल्टन्टस् लोकल ऍन्ड इंटरनॅशनल) व शेट्टी गल्ली येथील स्टॅन्डर्ड ग्रुप ऑफ एन्टरप्रायझीसवर छापे टाकले आहेत.

ट्रवलवर्डचा इम्तियाज अस्तुपटेल यरगट्टी (वय 40, रा. शाहूनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातून तीन संगणक, एक लॅपटॉप, जाहीरात पत्रक, व्हिजीटींग कार्ड, बोर्ड, परवाना, लेटरपॅड, 1 लाख 13 हजार रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच, एक मोटारसायकल व वेगवेगळय़ा सावजांचे 314 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

तर स्टॅन्डर्ड ग्रुप एन्टरप्रायझीस वरील छाप्यात दोन संगणक, दोन मोबाईल संच, 20 आधारकार्ड, व्हिजीटींग कार्ड, बोर्ड, शिक्के, ओळखपत्र,

13 डायरी, एक पासपोर्ट, तीन पावतीबुक जप्त करण्यात आले असून उमरफारुक अब्दुलहमीद (वय 40, रा. कुंदापूर) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उमरफारुक हा फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपलब्ध माहितीनुसार जॉब कन्सटन्स या नावाने दुकाने थाटून परदेशात नोकऱया मिळवून देण्याचे सांगून बेरोजगारांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक करण्यात येत होती. यापूर्वी अशा महाभागांकडून फशी पडलेल्या अनेकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असली तरी प्रत्यक्षात कारवाई झाली नव्हती. सोमवारी मार्केट पोलिसांनी धडक मोहीम राबविली आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इम्तियाजची चौकशी करण्यात येत होती.

Related Stories

महात्मा फुलेंनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे केली खुली

Patil_p

कर्नाटक : शाळकरी मुलांना दुपारच्या जेवणात अंड्याला पर्याय चिक्की

Sumit Tambekar

घरकुल प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करा

Omkar B

आरपीडीला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

कुदेमनी साहित्य संमेलन आयोजकांवरील खटला रद्दबातल

Omkar B

बेळगाव जिल्हा रोलर स्केटींग स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!