तरुण भारत

पेस्टल रंगसंगतीची कमाल

‘ए लाईन’ कुर्ते खूप छान दिसतात. अशा कुर्त्यांमुळे हटके आणि भारदस्त लूक मिळतो. अगदी ऑफिसपासून कॅज्युअल आउटिंगपर्यंत विविध ठिकाणी असे कुर्ते कॅरी करता येतात. सध्या गडद रंगाच्या कुर्त्यांपेक्षा पेस्टल शेड्सच्या कुर्त्यांना अधिक मागणी आहे.  असे कुर्ते पांढर्या किंवा काळ्या लेगिंग्जवर शोभून दिसतील. तसंच यासोबत मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट दुपट्टा, स्टोल घेता येईल. सध्याच्या ट्रेंडी पेस्टल रंगांविषयी…

  • लवेंडर हा परपलचा फिकट अवतार. यंदा पेस्टल लवेंडरची चलती असेल.  या रंगाचे कपडे खूप आकर्षक दिसतात. तुम्हीही लवेंडर रंगाचा ए लाईन कुर्ता घालून मिरवू शकता.
  • पेस्टल ग्रीन हा आल्हाददायक रंग. पेस्टल ग्रीन सिल्क कुर्ता घातल्यानंतर तुम्ही आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठराल.
  • निळ्या रंगातल्या पेस्टल शेड्सची बातच न्यारी. या छटांची आकर्षकता  डोळ्यात सामावते. तुम्हाला फार प्रयोग करायचे नसतील किंवा साधेपणा आवडत असेल तर पेस्टल ब्लू कुर्ता आणि पांढरी लेगिंग कॅरी करता येईल. अशा कुर्त्यांवर मिनिमल ज्वेलरी किंवा फक्त स्टड्स कॅरी करून तुम्ही छान दिसू शकता.
  • लाईट येलो कुर्तेही बेस्ट आहेत. पिवळा रंग अनेक प्रसंगांची शान ठरू शकतो. दैनंदिन वापरासाठी या रंगाच्या कुर्त्यांची निवड करा. या रंगाच्या कुर्त्यांवर कॉन्ट्रास्ट ज्वेलरी घालता येईल. 

Related Stories

लुक स्टयलिश विथ लिनन

Amit Kulkarni

ट्रेंडी विंटर वेअर

Omkar B

चिंता काळज्या ठेवा दूर

Amit Kulkarni

कौशल्य वाढवा

Omkar B

खरेदी वॉटर प्युरिफायरची

Omkar B

ताशीचा जिद्दीला सलाम

Amit Kulkarni
error: Content is protected !!