तरुण भारत

वाढतोय स्तनांचा कर्करोग

स्तनांचा कर्करोग अत्यंत घातक असा आजार बनत चालला असून त्याने फुफ्फुसाच्या कर्करोगालाही मागे टाकलं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वसामान्य प्रकार मानला जात असे. मात्र आता स्तनांच्या कर्करोगाने हे स्थान पटकावलं आहे. याच कारणामुळे महिलांनी जागरूक आणि सजग होणं आवश्यक आहे.

प्रतिबंध हाच स्तनांच्या कर्करोगाला  आळा घालण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. नियमित तपासणी तसंच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून या आजाराला लांब ठेवता येईल किंवा प्राथमिक टप्प्यात त्याचं निदान करता येईल.

Advertisements

स्तनांच्या कर्करोगाला लांब ठेवण्यासाठी पोषक आहाराला प्राधान्य देणं आवश्यक आहे. हिरव्या भाज्या, फळांचं सेवन करायला हवं. नियमित व्यायाम ही सुद्धा निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. व्यायाम तसंच योगासनांनी अनेक आजारांना लांब ठेवता येईल. स्तनांच्या कर्करोगालाही व्यायामाने प्रतिबंध घालता येऊ शकतो. तसंच मातांनी स्तनपान करवणंही आवश्यक आहे. रजोनिवृत्तीच्या काळात विशेष काळजी घ्यायला हवी. पोस्ट मेनोपॉज हार्मोन थेरेपी   घेतल्यामुळेही या आजाराला प्रतिबंध करता येईल. प्रदूषित वातावरणापासून लांब राहाणं, स्तनांची नियमित तपासणी करणं, स्तनांमध्ये  कोणताही बदल किंवा गाठ जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

स्तनांच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण बघता त्याच्या दाहकतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Related Stories

झोपेच्या गोळ्या घेताय

Amit Kulkarni

राज्यात आरोग्य विभागाची मेगाभरती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Abhijeet Shinde

आरोग्यविमा घ्यायचा तर…

Omkar B

डबल म्युटंट कोरोनावर स्टेरॉईड रामबाण

Amit Kulkarni

तापसि आशि राहते फिट

Amit Kulkarni

कॅन्सरशी ‘गाठ’ आहे !

Omkar B
error: Content is protected !!