तरुण भारत

मुख्यमंत्र्यांकडून माजी राज्यपाल राम जोइस यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी न्यायमूर्ती एम. राम. जोइस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जोइस यांचे मंगळवारी बेंगळूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवमोगा जिल्ह्यातील रहिवासी असलेले न्यायमूर्ती राम जोइस बिहार आणि झारखंडचे राज्यपाल होते. ते राज्यसभा सदस्य राहिले आहेत. तसेच ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पहिले आहे. त्यांनी कायदा आणि घटना यावर लिहलेल्या पुस्तकातून त्यांचे कायदेविषयक विचार चांगलेच प्रतिबिंबित झाले होते.

न्यायमूर्ती जोइस यांना आणीबाणीच्या काळात तुरूंगात टाकले गेलेयाचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. त्याच्या निधनाने आपण एक महान विचारवंत गमावला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दु: ख व्यक्त केले. त्यांनी प्रार्थना केली, त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती लाभो आणि शोक झालेल्या कुटुंबाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: व्हीटीयूने ६ अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता केली रद्द

triratna

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

Rohan_P

आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

Amit Kulkarni

कर्नाटक: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण मोहीम शक्य

triratna

सीडी प्रकरणातील दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Amit Kulkarni

म्हैसूर: ३२ वर्षीय आरोग्य अधिकाऱ्याचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!