तरुण भारत

मध्यप्रदेश : बस दुर्घटनेत 39 प्रवाशांचा मृत्यू, 8 बेपत्ता

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

मध्यप्रदेशच्या सिधी येथील बस दुर्घटनेत 39 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तर 7 जण बचावले आहेत. 

Advertisements

सिधीहून सतनाच्या दिशेने निघालेली प्रवासी बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 30 फूट खोल कालव्यात कोसळली. या बसमधून 54 प्रवाशी प्रवास करत होते. बस 20 ते 22 फूट पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. मात्र, 7 प्रवाशी कसेबसे पाण्याबाहेर आले. क्रेनच्या सहाय्याने बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या 5 संक्रमितांचे विमानतळावरून पलायन

datta jadhav

कलम ३७० हटवल्यानंत्तर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर

Abhijeet Shinde

आझाद मैदानावर शिक्षकांनी केलं मुंडण आंदोलन

Abhijeet Shinde

हिमाचलमध्ये 4 नवे कोरोना रुग्ण, एकूण 185 रुग्णांवर उपचार सुरू

Rohan_P

कर्नाटकातील ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 92% बेंगळूरमध्ये; 84% सक्रिय

Sumit Tambekar

भारतात मागील 24 तासात 8171 नवे कोरोना रुग्ण, 204 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!