तरुण भारत

गॅलेक्सीचे ‘एफ-62’ मॉडेल बाजारात लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सॅमसंगने नवीन गॅलेक्सी एफ-62 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. यामध्ये एफ-आवृत्तीमधील हा दुसरा स्मार्टफोन असल्याची माहिती आहे. फोन पंच-होल डिस्प्ले डिझाइन आणि चार रियर कॅमेऱयासोबत सादर केला आहे.

Advertisements

सदर मॉडेलमध्ये विशेष बाब म्हणजे 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर ऍक्सीनॉस 9825 प्रोसेसरसोबत येतो, ज्याला 2019 मध्ये लाँच केलेल्या गॅलेक्सी नोट 10 आवृत्तीमध्येही सुविधा राहिल्याची माहिती दिली आहे. 

विशेष सुविधा

सदर स्मार्टफोनचे दोन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. यातील बेसिक मॉडेलमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळणार असून यांची भारतीय बाजारात किंमत 23,999 रुपये राहणार असल्याचे संकेत आहेत. टॉप मॉडेलमध्ये 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असणारी सुविधा प्राप्त होणार असून याची किमत ही 25,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.

सवलत योजना

लाँचिंग ऑफरसह गॅलेक्सी एफ-62 या मॉडेलच्या खरेदीवर सवलत मिळणार असून यामध्ये जिओ ग्राहकांना 3 हजार रुपयांचे रिचार्ज डिस्काउंट कूपन आणि 7 हजार रुपयांचे रिलायन्स पार्टनर बँण्ड कूपन मिळणार आहे. यासह आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर 2500 रुपयांपर्यंत कॅशबॅक देणार असल्याची घोषणा केली आहे.

सरकार एनएफएलमधील वाटा विकणार

नवी दिल्ली ः सरकारने नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड (एनएफएल) मधील 20 टक्के इतका वाटा विकण्याची योजना बनवली आहे. ही विक्री ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून केली जाणार असून याकरीता व्यवहार करण्यासाठी मर्चंट बँकर्स, ब्रोकर्स आणि कायदेशीर सल्लागारांनाही आवाहन करण्यात आले आहे. सदरच्या कंपनीत सरकारचा एकंदर वाटा हा 74 टक्के इतका आहे. ही कंपनी देशात युरियाचा सर्वात मोठा पुरवठा करणारी उत्पादक कंपनी म्हणून नावाजलेली आहे. सदरच्या वाटा विक्रीतून सरकारला 408 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारला सदरची रक्कम प्राप्त करायची आहे, त्यासाठीच हिस्सेदारी विकण्याचा मार्ग सरकारकडून अनुसरला जात आहे.

Related Stories

आयफोन कंपनी ऍपलची परिषद जूनमध्ये

Amit Kulkarni

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

Patil_p

शिओमीचे लॅपटॉप लवकरच बाजारात

Omkar B

रियलमीचा नारजो 20 फोन 21 सप्टेंबरला

Patil_p

ओप्पो एफ 19 भारतात लाँच

Patil_p

व्होडाफोन-आयडियाचे स्वस्त प्लॅन सादर

Patil_p
error: Content is protected !!