तरुण भारत

चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीत

सेन्सेक्समध्ये 50 अंकांची घट – आयटी समभागांची मोठी विक्री

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी भारतीय शेअर बाजारात चढउताराचा कल राहिला होता. याचा परिणाम म्हणून बीएसई सेन्सेक्स दिवसभरातील कामगिरीनंतर मात्र 50 अंकांनी घसरुन बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

खासगी बँक आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये मंगळवारी घसरण राहिल्यामुळे शेअर बाजारात हलकीशी घसरण राहिली होती. प्रारंभीच्या कालावधीत बीएसई सेन्सेक्स 52517 अंकांच्या नव्या विक्रमावर राहिला होता.  पुन्हा 650 अंकांच्या घसरणीसोबत 51864 अंकांवर आला होता. परंतु दिवसअखेरीस मात्र सेन्सेक्स 50 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,104.17 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला निफ्टीमध्ये 1.25 अंकांच्या घसरणीसोबत 15,313.45 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील 16 समभाग घसरणीसोबत बंद झाले असून सोबत पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 1 ते 6 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले, आयशर मोर्ट्स, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस आणि इन्फोसिस यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

सोमवारी विक्रमी नेंद

सेन्सेक्सने सोमवारी जवळपास 363 अंकांची मजबूत कामगिरी करुन 51,907 अंकांचा विक्रम नेंदवला होता. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये व्यापारात सेन्सेक्सने मोठी मजल मारली होती. त्यांनी 52 हजारचा नवा टप्पा प्राप्त केला होता. या मजबुतीसोबत सेन्सेक्सने 609.83 अंकांचा उच्चांक नेंदवला होता. परंतु दुसऱया दिवशी मात्र मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे.

जगभरातील बाजार विक्रमी स्तरावर

जपानचा निक्कीचा निर्देशांक 380 अंकांनी वाढून 30,465 वर बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील विविध शेअर बाजार तेजीत राहिले होते. यामध्ये अमेरिकेचा शेअर बाजार सलग 12 व्या दिवशीही तेजीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

सॅमसंग ए 51 ची विक्री 60 लाखावर

Patil_p

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

ऍपलने ऍप स्टोअरवरुन 4500 चिनी गेम्स हटविले

Patil_p

2020-21 वर्षात वीज मागणी राहणार कमी

Patil_p

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

आयटीआयची 4 जी-5जी उपकरणे बनविण्यास सक्षम

Patil_p
error: Content is protected !!