तरुण भारत

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार

2 वर्षांपूर्वीच्या घटनेची वाच्यता – सहकाऱयाकडून दुष्कर्म – पंतप्रधानांनी मागितली माफी

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisements

ऑस्ट्रेलियात माजी सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेने संसद भवनात बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. 2018 मध्ये एका रात्री पार्टीदरम्यान एका सहकाऱयाने संसद भवनातील संरक्षण मंत्र्यांच्या दालनात आणून तेथे बलात्कार केल्याचा आरोप 26 वर्षीय ब्रिटनी हिगिन्स यांनी केला आहे. गुन्हय़ावेळी स्कॉट मॉरिसन यांचे आघाडीचे सरकार सत्तेवर होते. पंतप्रधानांनी या प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास करविला नसल्याचे तिने म्हटले आहे. तसेच ब्रिटनी यांनी बलात्काऱयाचे नावही उघड केलेले नाही.

हिगिन्स घटनेवेळी 24 वर्षांची होती. पार्टीनंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने एका सहकाऱयाने मला संसद भवनात नेले, तेथील संरक्षणमंत्र्यांच्या दालनात माझ्यावर बलात्कार केला. माझ्यासोबत घडलेल्या दुष्कर्माची माहिती अन्य सहकाऱयांना दिली, सरकार आणि पोलिसांनाही या विषयी पुरावे दिले. डेमोक्रेटिक पार्टीने न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला, पण आतापर्यंत काहीच केले नसल्याचा दावा ब्रिटनी यांनी केला आहे.

बलात्कार करणारा व्यक्ती लिबरल पार्टीचा उदयोन्मुख राजकारणी असल्याचे ब्रिटनीने म्हटले आहे. गुन्हय़ावेळी मद्याचे मोठय़ा प्रमाणावर प्राशन केल्याचेही तिने मान्य केले आहे. संरक्षणमंत्री तसेच 12 अन्य लोकांना बलात्काराविषयी सांगितले होते, असे पीडितेने नमूद केले आहे. या घटनेच्या काही काळानंतर पंतप्रधान मॉरिसन यांनी देशात निवडणुकांची घोषणा केली होती. तर मॉरिसन यांनी आता संबंधित महिलेची माफी मागितली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार देशात 15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या दर 6 मुलींपैकी एक मुलगी लैंगिक हिंसाचाराला बळी पडते, अनेक प्रकरणांमध्ये कामकाजाच्या ठिकाणीच दुष्कर्म होत असल्याचे म्हटले गेले आहे.

Related Stories

अमेरिकेत उद्यापासून एच-1बी व्हिसावर निर्बंध

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्याना कोरोनाची बाधा

datta jadhav

तुर्कस्तानात संकट वाढले

Patil_p

जगभरात कोरोनाबळींनी ओलांडला 20 लाखांचा टप्पा

datta jadhav

येमेनमध्ये हूती बंडखोर बॅकफूटवर

Patil_p
error: Content is protected !!