तरुण भारत

भारत-सर्बिया महिला फुटबॉल सामना आज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2022 च्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या पूर्वतयारीला भारतीय महिला फुटबॉल संघाने प्रारंभ केला आहे. दरम्यान सर्बिया आणि भारत यांच्यातील फुटबॉलचे तीन मित्रत्वांचे सामने तुर्कीमधील अलेनिया येथे आयोजित केले आहेत. फिफाच्या या मैत्रीपूर्ण महिला संघातील फुटबॉल सामन्यांना बुधवारपासून प्रारंभ होत आहे.

भारत आणि सर्बिया महिला फुटबॉल संघामध्ये तुर्कीत फिफाने तीन आंतरराष्ट्रीय मित्रत्वांचे फुटबॉल सामने फेबुवारी महिन्यात आयोजित केले आहेत. या मित्रत्वांच्या फुटबॉल सामन्यातील भारताचा पहिला सामना बुधवारी 17 फेब्रुवारीला सर्बियाबरोबर होणार आहे. त्यानंतर भारत आणि रशिया महिला फुटबॉल संघातील दुसरा सामना 19 फेब्रुवारीला तर तिसरा आणि शेवटचा मित्रत्वांचा फुटबॉल सामना युक्रेनबरोबर 23 फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचे नेतृत्व संगीता बेसफोरकडे सोपविण्यात आले आहे. भारतीय महिला फुटबॉल संघासाठी गोव्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सराव शिबीर आयोजित केले होते. भारतीय संघामध्ये आशालता देवी ही प्रमुख हुकमी फुटबॉलपटू म्हणून ओळखली जाते.

Related Stories

आयसीसी अध्यक्ष निवड प्रक्रियेची दिशा आज ठरणार

Patil_p

बांगलादेश क्रिकेट मंडळावर माजी कर्णधार मोर्तझा नाराज

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे यंदा प्रथमच‘व्हर्च्युअल’ वितरण

Patil_p

जोकोव्हिचचे वर्षअखेरचे अग्रस्थान निश्चित

Patil_p

निवड समितीसाठी माजी खेळाडूंचे अर्ज दाखल

Patil_p

विविध राज्यांच्या क्रीडामंत्र्यांची ऑनलाईन बैठक

Patil_p
error: Content is protected !!