तरुण भारत

फसवणाऱया कंपन्या बदलताहेत, एजंट तेच!

चिपळुणातील प्रकार, एजंटानाच धडा शिकवण्याची आलेय वेळ

प्रतिनिधी/ चिपळूण

Advertisements

गेल्या दहा वर्षात सुमारे 80 कोटी रूपये लुबाडून अनेक कंपन्यांनी येथून पोबारा केला आहे. या फसवणाऱया कंपन्या वेगवेगळय़ा असल्या तरी त्यांचे स्थानिक एजंट मात्र तेच तेच आहेत. कंपन्या गाशा गुडाळून गेल्यावर हे एजंट ग्राहकांच्या पाठिशी असल्याचा केवळ देखावा करतात. त्यांची ही फसवेगिरी आता ग्राहकाच्या लक्षात येऊ लागल्याने आता कंपन्याबरोबरच या एजटांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

   जादा व्याज, ‘ऑनलाईन जाहिरातीवर क्लिक करा आणि पैसे कमवा’, चेन मार्केटिंग आदी स्वरुपातील अनेक कंपन्या गेल्या दहा वर्षात येथे आल्या. पैसे गोळा करण्याचे आपले उदिष्ट पूर्ण झाल्यावर या सर्व कंपन्यांनी पोबारा केला आहे. अशा कंपन्यांमध्ये टिंक्वल, पॅनकार्ड, ईडू ऍण्ड अर्न कन्सलटन्सी, अर्न इंडिया, कलकाम, स्वाईल, मायक्रो फायनान्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. यातील अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल असून काहींना अटकही झाली आहे. मात्र कायदेशीर लढा देऊनही फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नसल्याचे पुढे येत आहे.

   येथे येणाऱया कंपन्या करोडो रूपयांची माया गोळा करून निघून जातात. याचा अनुभव असतानाही चिपळूणवासिय पुन्हा नव्याने येणाऱया कंपनीत पैसे का गुतवतात असा प्रश्न अन्य नागरिकांसह पोलिसांनाही पडत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कंपन्या बदलल्या तरी त्यांचे काम करणारे एजंट तेच तेच आहेत. एका कंपनीने तुमच्यासह आम्हालाही धोका दिला, त्यामुळे दोघांचेही झालेले नुकसान आपण आता नव्या कंपनीच्या माध्यमातून भरून काढूया असे नवे आमिष दाखवून या ग्राहकांना पैसे गुतवण्यास ते भाग पाडत आहेत. मात्र दुसरी कंपनीही फसवून गेली की, आम्हाला असे होईल असे वाटले नव्हते. आता तुम्ही त्यांची तक्रार करा, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत अशी भूमिका घेताना हे एजंट्स दिसतात.

   ग्राहकांनी तक्रार किंवा उपोषणे करण्याची तयारी सुरू केली की आपल्यालाही हे जड जाणार हे माहित असल्याने काही एजंट यंत्रणेला मॅनेज करण्यास सुरूवात करतात. काही एजंट्स तर त्या ग्राहकांचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवतात. त्यामुळे सामान्य ग्राहकांना एजंट किती चांगला आहे असे वाटते आणि त्यांची पुन्हा फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांनी जागे होण्याची गरज आहे. फसवणूक होऊ नये म्हणून अशा कंपन्यांमध्ये गुतवणून न करता फसवणूक करणाऱया कंपन्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार करताना ज्यांनी आपल्याकडून पैसे घेतले त्या एजंटांना मुख्य आरोपी करण्याची वेळ आली आहे. तरच स्वतःच्या फायद्यासाठी शेकडो जणांचे नुकसान करणाऱया एजंटांना अद्दल घडू  शकते.

आजही अनेक कंपन्या कार्यरत

आजही शहर परिसरात अनेक कंपन्या पैसे गोळा करीत असून त्यातील काही कंपन्या गाशा गुडाळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुतवणूक केलेल्या ग्राहकांनी सजग राहण्याची गरज आहे.

आयुष्याची पुंजी वाया गेली

याबाबत निवृत्तीनंतर जवळच्या एजंटाने सागितल्यानुसार एका कंपनीत पैसे गुतवले. मात्र ही कंपनी बंद पडली. माझे सर्व पैसे त्यात अडकले आहेत. त्यामुळे आजारपणला पैसे आणायचे कोठून असा प्रश्न असून चुकीच्या सल्ल्यामुळे माझ्या आयुष्याची पुंजी वाया गेली आहे.

– बबन जाधव, चिपळूणफसवणूक झालेले ग्राहक

Related Stories

न्यायालयाच्या निर्णयाकडे संपकरी एसटी कर्मचाऱयांचे लक्ष

Patil_p

सिंधुदुर्ग पूरग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज द्या- जिल्हा भाजपच्यावतीने निवेदन

Ganeshprasad Gogate

भरधाव ओमनीने वृध्देला चिरडले

Patil_p

चिपळुणात बारा सदनिकांना चोरून वीजपुरवठा!

Patil_p

पांढऱया चिपीचे होणार जतन, संरक्षण!

Patil_p

धोकादायक विहिरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

NIKHIL_N
error: Content is protected !!