तरुण भारत

मोरया गुप 1995 संघ विश्वजित ट्रॉफीचा मानकरी

सांबरा  : बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे विश्वजीत क्रिकेट क्लब आयोजित हाफपिच फुलग्राऊंड क्रिकेट स्पर्धेत ‘मोरया ग्रुप 1995 या संघाने विजय मिळवत विश्वजीत ट्रॉफी पटकावली. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे 1990 पासून 2020 पर्यंतच्या दहावीच्या सर्व वर्गमित्रांच्या संघांनाच त्यात प्रवेश देण्यात आला होता. एकूण 30 संघानी या स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम सामन्यात मोरया ग्रुप 1995 संघाने क्लासमेट 1990 संघावर शानदार विजय मिळवित विश्वजीत ट्रॉफी पटकावली. विजेत्या संघाला ट्रॉफीसह 5,500 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या क्लासमेट 1990 या संघाला द्वितीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्व संघांना माजी विद्यार्थी संघटना 1980 यांच्याकडून स्मृतिचिन्हे देण्यात आली. या स्पर्धेनिमित्त जुने वर्गमित्र एकत्र आले आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना, गावातील युवक मंडळे व विश्वजीत क्रिकेट क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सचिन चौगुले यांनी आभार मानले.

Related Stories

शहापूर परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळी येथे भरदिवसा घरफोडी

Patil_p

शरद पै यांना रोटरी फौंडेशन-रोटरी क्लबचा पुरस्कार

Patil_p

खानापूर तालुक्याचा औद्योगिक विकास घडवा

Amit Kulkarni

समर्थ नगर ब्रम्हलिंग मंदिराचा जिर्णोद्धार

Amit Kulkarni

शांताई वृद्धाश्रमात कोविड लसीकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!