तरुण भारत

साईराज वॉरियर्स, झेवर गॅलरी संघ विजयी

प्रतिनिधी / बेळगाव

कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित कै. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात झेवर गॅलरी संघाने अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सचा 42 धावांनी तर साईराज वॉरियर्सने साई स्पोर्ट्सचा पाच गडय़ानी पराभव केला. पार्थ पाटील (झेवर गॅलरी), विठ्ठल हबिब (साईराज) यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Advertisements

युनियन जिमखाना मैदानावर मंगळवारी घेण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात झेवर गॅलरीने 20 षटकात 3 बाद 173 धावा केल्या. त्यात पार्थ पाटीलने 4 षटकार, 5 चौकारासह 52 चेंडूत 77, माजीद मकानदारने 34 चेंडूत नाबाद 50 तर सुधन्वा कुलकर्णीने 20 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे रोहित पाटीलने 37 धावात 2 तर वसंत शहापूरकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सचा डाव 17.2 षटकात 131 धावात आटोपला. त्यात स्वप्नील हेळवेने 47 चेंडूत 74, झिनत मुडबागीलने 17 धावा तर विशाल बेडकाने 13 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे पार्थ पाटीलने 22 धावात 3, किरण तारळेकरने 17 धावात 2 तर आकाश पत्तारने 28 धावात 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात साई स्पोर्ट्सने 20 षटकात 7 बाद 149 धावा केल्या. त्यात रोहित पोरवालने  50, आनंद कुंभारने नाबाद 42, परीक्षित उकुंडीने 11 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे संतोष सुळगे-पाटीलने 27 धावात 3, विठ्ठल हबिबने 24 धावात 3 तर अभिषेक होण्णावरने 27 धावात 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल साईराजने 18.2 षटकात 5 बाद 150 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. त्यात विठ्ठल हबीबने 4 षटकार, 6 चौकारासह 63, नरेंद्र मांगोरेने नाबाद 41, संतोष सुळगे-पाटीलने नाबाद 27 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे रवि पिल्ले, परीक्षित ऊकुंडी व मदन बेळगावकर यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विठ्ठल गवस, सलमान गोकाक, महेश फगरे, सुनील सौदी यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल नरेंद्र मांगोरे, सर्वाधिक षटकार विठ्ठल हबीब, इम्पॅक्ट खेळाडू रोहित पोरवाल, सामनावीर विठ्ठल हबीब तर दुसऱया सामन्यात गजानन मिसाळ, शांतकुमार, नंदनकुमार, विक्रम देसाई यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल वसंत शहापूरकर, सर्वाधिक षटकार स्वप्नील हेळवे व पार्थ पाटील, सामनावीर पार्थ पाटील यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

बुधवारचे सामने

1) अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. डीके लायन्स सकाळी 9 वाजता.

2) लॉगर वि. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स दु. 1 वाजता

Related Stories

कोरोनाने मानवी समुहाची जीवनशैलीच बदलली!

Amit Kulkarni

जमखंडीत विद्यार्थिनींनी पाहिला गुरु-शनिचा नजारा

Omkar B

बिजगर्णी ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत रुकय्या नावगेकर बिनविरोध

Amit Kulkarni

केएलईमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन

Amit Kulkarni

टूलकिट प्रकरण : महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना पाठविली नोटीस

triratna

दूध विक्रेत्यांना पोलिसांचा त्रास

tarunbharat
error: Content is protected !!