तरुण भारत

कणकुंबी-पारवाड ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

जांबोटी सोसायटीच्यावतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन : नवनिर्वाचित सदस्यांना जबाबदारी-कर्तव्याची करून दिली जाणीव

वार्ताहर / कणकुंबी

Advertisements

जांबोटी येथील दि जांबोटी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने कणकुंबी आणि पारवाड या दोन्ही ग्रामपंचायतीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा सत्कार कणकुंबी येथील श्री माऊली देवस्थानच्या सभागृहात नुकताच करण्यात आला.  समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष आणि जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य विलास बेळगावकर होते.

प्रारंभी सोसायटीचे व्यवस्थापक विष्णू पवार यांनी स्वागत केले. त्यानंतर सोसायटीचे संस्थापक, उपाध्यक्ष आणि बैलूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी  प्रास्ताविकात पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये राज्यात 90 टक्के पहिल्यांदाच निवडून आलेले नवीन सदस्य आहेत. त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल अधिक ज्ञान नसल्याने सुरुवातीला बरीच अडचण निर्माण होते. पाच वर्षांत कोणकोणती कामे करावित, कोणकोणत्या कामाची जबाबदारी आपल्यावर आहे, ते समजून घेण्यासाठी अडीच-तीन वर्षे जातात तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकवाक्मयता नसेल तरीही खूप त्रास होतो. निवडणुकीत झालेले राजकारण बाजूला ठेवून गावच्या किंवा आपल्या वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी वेळ खर्च करावा, सर्व सदस्यांनी एकीने राहून पाच वर्षांत आपले नाव अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. विशेषतः गोरगरीब आणि गरजूंची नावे लाभार्थी म्हणून निवडावित, असे मार्गदर्शन केले.

यावेळी कणकुंबी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष रमेश रामचंद्र खोरवी, उपाध्यक्षा  शकुंतला शंकर गस्ती, सदस्या आरती कृष्णा नाईक, दिप्ती दिलीप गवस, नीलिमा भिकाजी महाले कणकुंबी, सुप्रिया संदीप हरिजन व रामनाथ नारायण चौगुले चिगुळे तसेच पारवाड ग्रामपंचायत अध्यक्षा प्रियांका पद्माकर गावकर, उपाध्यक्ष भिकाजी अर्जुन गावडे, सदस्य सुनील वासुदेव पवार, बाबाजी रामचंद्र पाटील, सुलोचना तुकाराम नाईक, सीता रामा सुतार, पार्वती महादेव हरिजन आणि सत्यवती सीताराम हरिजन या सर्व सदस्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी सोसायटीच्या कामकाजाबद्दल तसेच राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच बेळगाव येथील कॉलेजचे प्राचार्य भैरू पाटील यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी सोसायटीचे संचालक मनोहर गणपती डांगे, पांडुरंग नारायण नाईक, लक्ष्मण दळवी व इतर सर्व संचालक, सोसायटीच्या जांबोटी, कणकुंबी बैलूर व खानापूर शाखांचे कर्मचारी तसेच कणकुंबी गावचे लक्ष्मण गावडे, शिवाजी दळवी तसेच कणकुंबी, चिगुळे, बेटणे व इतर गावातील सोसायटीचे भागधारक उपस्थित होते.

कर्नाटक सरकारने पहिल्यांदाच खानापूर तालुक्मयाला कर्नाटक वन महामंडळाचे संचालकपद नियुक्त केले आहे. सुरेश देसाई हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांनी निट्टूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष तसेच तालुका पंचायतीच्या माजी उपाध्यक्षपदी कार्य केले आहे. देसाई यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या देसाई यांची कर्नाटक वन महामंडळावर नियुक्ती केलेली आहे.

सामाजिक, शैक्षणिक व राजकीय व्यक्तींचा सत्कार

सोसायटीच्यावतीने निट्टूर गावचे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष, व ता. पं. माजी उपाध्यक्ष सुरेश देसाई यांची कर्नाटक वन महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याने सुरेश देसाई यांचा तसेच कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांना आविष्कार फैंडेशन इंडिया संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने आणि कणकुंबी श्री माऊली देवी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष आणि नागरिक राजाराम लक्ष्मण गावडे यांची म. ए. समितीच्या मध्यवर्ती समितीवर सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचा सोसायटीच्यावतीने संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी आणि संचालक मनोहर डांगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून आणि फेटा बांधून तिघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती सुरेश देसाई, एस. जी. चिगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले.

Related Stories

शहापूर-वडगावमध्ये लक्ष्मीपूजन भक्तिभावाने

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी 2 हजार बसपासचे वितरण

Amit Kulkarni

मुतगा येथे वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू

Patil_p

मंगाई मंदीर परिसरात ड्रेनेजचे पाणी

Patil_p

नळाला थेट विद्युतपंप लावल्याने पाणीटंचाई

Amit Kulkarni

प्रा.डॉ.शोभा नाईक यांना कबीर पुरस्कार जाहीर

Patil_p
error: Content is protected !!