तरुण भारत

हिंडलगा यात्राकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवा

हिंडलगा लक्ष्मीयात्रा संघातर्फे हेस्कॉमला निवेदन

वार्ताहर / हिंडलगा

Advertisements

हिंडलगा येथे दि. 16 ते 20 मार्चदरम्यान होणाऱया श्री महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्या आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवून सहकार्य करण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि. 16 रोजी श्री महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव संघातर्फे हेस्कॉमच्या विभागीय अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

हेस्कॉमला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शंभर वर्षांनंतर हिंडलगा येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. 16 ते 20 मार्च 2021 या काळात भरयात्रा होणार आहे. यात्रेदरम्यान रथ मिरवणूक होणार असल्याने लोंबकळणाऱया वीजतारांचा अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा धोकादायक स्थितीत असलेल्या वीजवाहिन्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, तसेच यात्रा काळात वीजपुरवठा खंडित न करता सुरळीत करून ग्रामस्थांना सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विभागीय अधिकारी कोलकार यांनी निवेदन स्वीकारून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी हेस्कॉमतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी श्री महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे, कार्याध्यक्ष रमाकांत पावशे, सेपेटरी प्रकाश बेळगुंदकर, श्रीकांत जाधव, सदस्य रविंद्र सरप, तुकाराम फडके, चंद्रकांत माने, अनिल हेगडे, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र कुदेमानीकर, विशाल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

धामणे दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ

Patil_p

हंगामी कामगारांवर बेरोजगारीची वेळ

Amit Kulkarni

शनिवारी 631 जण कोरोनामुक्त, 274 नवे रुग्ण चौघा जणांचा मृत्यू

Patil_p

कर्नाटक: पीपीई किट उघड्यावर टाकल्याने विषाणूचा धोका वाढतोय

Abhijeet Shinde

कपिलेश्वर रोड परिसरातील नागरिक आक्रमक

Patil_p

शहर हेस्कॉम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Patil_p
error: Content is protected !!