तरुण भारत

सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूसाठा जप्त

बहाद्दरवाडीत पोलिसांची कारवाई : एकाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव अबकारी खाते व पोलिसांनी धाड टाकून गोवा बनावटीच्या दारूचा अवैध दारूसाठा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. काल मंगळवारी सीसीबीआय पोलिसांनी 13 लाखांची दारू जप्त केल्यानंतर आज बुधवारी पोलिस खात्याने धाड टाकून केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बहाद्दरवाडी (ता. बेळगाव) गावामध्ये धाड टाकून पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी लक्ष्मण उर्फ बाळू सातेरी पाटील (वय 50 रा. ब्रह्मलिंग गल्ली, बहाद्दरवाडी) या इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील बेकायदा दारू विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारूच्या 750 मिलीच्या 436 बाटल्या जप्त केल्या आहेत.

या अवैध दारूची किंमत 7,850 रूपये इतकी होते. बेळगाव ग्रामीण पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपीकडून तीन मोबाईल संच देखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

पद्मभूषण डॉ.पद्माकर दुभाषी यांचे निधन

datta jadhav

घरावर हल्ला करणाऱया आरोपींना अटक करा

Omkar B

बाराशे प्राध्यापक-कर्मचाऱयांचे अहवाल निगेटिव्ह

Omkar B

सांबरा विमानतळावर खबरदारी

Patil_p

शेताकडे जाणाऱया शेतकऱयांची चौकशी

Amit Kulkarni

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा!’

Amit Kulkarni
error: Content is protected !!