22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

नागठाणे गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला भोसकले

दुचाकीवरुन आलेल्या तीन युवकांचे कृत्य

प्रतिनिधी/ सातारा

एकीकडे कोरोनाचा चढउतार होत असल्याने नेमके काय चाललेय हे कळेनासे झालेय. त्यातच सर्व जगरहाटी सुरु झाल्यानंतर कोरोनाचे भय कमी झाल्याने जिल्हय़ात क्राईमरेट पुन्हा जोर धरु लागलाय. नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत  राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी एका दुचाकीस्वारास अडवून तीन अनोळखी युवकाने चाकूने भोसकल्याची खळबळजनक घडलीय.

देवीदास कुंडलिक पवार वय 48, रा. संगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर असे पोटात भोसकल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देविदास कुंडलिक पवार हे मंगळवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर येथून दुचाकीवरून पुण्याकडे जात होते.

त्यावेळी नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत पाठीमागून त्यांचा पाठलाग करत आलेल्या अज्ञात तीन दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. भर रस्त्यात हा प्रकार सुरु होता. काही वेळ झटापटीनंतर त्यातील एका अनोळखी युवकाने त्यांच्या पोटात चाकूने भोसकल्याने त्यात ते जखमी झाले आणि रस्त्यावर कोसळले. त्यानंतर युवकांनी पोबारा केला.

कोणीतरी ही घटना 108 रुग्णवाहिकेस व पोलिसांना कळवल्यानंतर देवीदास पवार यांना जखमी अवस्थेत सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आहे.

Related Stories

पालिकेच्या वसुंधरा अभियानाचा फियास्को

Patil_p

जनमानसात कमालीची अस्वस्थता; छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा

pradnya p

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटच्या माध्यमातून केली ‘ही’ मागणी

triratna

राज्यपालांना सरकारी विमानानं प्रवास करण्यास परवानगी नाकारली

Shankar_P

…हा तर लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार : संजय राऊत

pradnya p

… अन्यथा मंदिरांची टाळी तोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

pradnya p
error: Content is protected !!