तरुण भारत

खेर्डीतील ‘स्वामी समर्थ’ मार्केटिंग कंपनीच्या संचालकाला अटक

ग्राहकांची 36 लाखाची फसवणूक प्रकरण -रेल्वेस्थानकातून घेतले ताब्यात

चिपळूण

Advertisements

नोकरी व कमिशनचे आमिष दाखवत शहरालगतच्या खेर्डी येथे श्री स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस या मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करणाऱया संचालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  संजय रामभाऊ चव्हाण (खेर्डी-माळेवाडी) असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. चव्हाण यांने नोकरी व कमिशनचे आमिष दाखवून मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून 23 जणांची 23 लाख 73 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला होता. या संदर्भात कैलास मालुसरे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. यानंतर प्रकारानंतर फसवणूक झालेले ग्राहकही पुढे येऊ लागल्याने यातूनच आतापर्यंत 113 जणांनी आपली फसवणूक झाल्याच्या तक्ररी पोलीस स्थानकात दिल्या आहेत. त्यानुसार 36 लाख 84 हजाराची रक्कम झाली आहे.

  फसवणूक प्रकरणी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथकही तयार केले होते. चव्हाण हा चिपळूण रेल्वेस्थानका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचला असता त्यात चव्हाण सापडला. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, चव्हाण यांच्या पोलीस चौकशीतून फसवणुकीची आणखी काही महत्वाचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच फसवणुकीची तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी देखील वाढू लागत असल्याचे चित्र आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.

Related Stories

जिल्हय़ातील स्थलांतरीत मजुरांना आवाहन

NIKHIL_N

मजूर टेम्पोतून निघाले ‘यूपी’ला

NIKHIL_N

रत्नागिरीत मानवी सांगाडा सापडला

Patil_p

‘तरूण भारत’ ने शंभर वर्षात विश्वासार्हता जपली!

triratna

सोशल डिस्टन्सिंग पाळून मासळी लिलाव

NIKHIL_N

चिपळूण : पोलिसांनी जप्त केला देशी-विदेशी मद्य साठा

Shankar_P
error: Content is protected !!