तरुण भारत

ओडिशावर विजय नोंदवून एफसी गोवा चौथ्या स्थानावर

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात एफसी गोवाने विजयाची नोंद करताना शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशा एफसीला 3-1 गोलानी पराभूत केले. काल हा सामना फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आला.

Advertisements

या सामन्यात एफसी गोवासाठी आल्बेर्तो नोगुएरा, जॉर्गे ऑर्तिज आणि आयव्हन गोन्साल्वीसने तर पराभूत ओडिशा एफसीचा एकमेव गोल डायगो मॉरिसियोने केला. या विजयाने एफसी गोवा संघाला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला. त्यांचे आता 18 सामन्यांतून सहा विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 27 गुण झाले आहे. पराभूत ओडिशा एफसीचा संघ तळाला असून त्यांचा हा स्पर्धेतील अकरावा पराभव ठरला. 18 सामन्यांतून केवळ एक विजय आणि सहा बरोबरीने 9 गुण कायम राहिले.

या निकालाने एफसी गोवा आता पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर गेला. सध्या प्रत्येकी 17 सामन्यांतून 36 गुणांनी एटीके कोलकाता पहिल्या तर 34 गुणांनी मुंबई सिटी एफसी दुसऱया स्थानावर आहेत. हैदराबाद एफसी 18 सामन्यांतून सरस गोलांच्या सरासरानी 27 गुणांनी तिसऱया तर एफसी गोवाचेही तेवढेच गुण असून ते चौथ्या स्थानावर आहेत. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला एफसी गोवाला गोल करून आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. यावेळी जॉर्गे ऑर्तिजच्या पासवर आल्बेर्तोचा फटका ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगने अडविला. त्यानंतर 18 व्या मिनिटाला एफसी गोवाने गोल करून आघाडी घेतली. आयव्हन गोन्साल्वीसने केलेल्या क्रॉसवर एका जबरदस्त हेडरवर आल्बेर्तो नोगुएराने गोलरक्षक अर्शदीप सिंगला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला.

सामन्याच्या 26 व्या मिनिटाला एफसी गोवाने आपली आघाडी दोन गोलांनी वाढविली. यावेळी सावियर गामाने दिलेल्या पासवर जॉर्गे ऑर्तिजने प्रतिस्पर्धी बचावपटू आणि नंतर गोलरक्षक अर्शदीपला लिलया भेदले आणि गोल नोंदविला. दहा मिनिटांनी ओडिशा एफसीच्या डायगो मॉरिसियोने राकेश प्रधानने दिलेल्या पासचे सोने करताना एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगला भेदले व संघाची पिछाडी एक गोलने कमी केली.

त्यानंतर एफसी गोवाची आक्रमणाची मालिका दुसऱया सत्रातही चालूच राहिली. यावेळी जॉर्गे ऑर्तिज, इगोर अँग्युलो आणि आयव्हन गोन्साल्वीस यांचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. ओडिशाचा डायगो मॉरिसियो वगळता त्यांचे अन्य खेळाडू आपला विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. 75 व्या मिनिटाला कॉर्नरद्वारे मिळालेल्या चेंडूवर आयव्हन गोन्साल्वीसने एफसी गोवाचा तिसरा गोल केला.

Related Stories

श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांचे महानिर्वाण

Amit Kulkarni

पणजी जिमखानाच्या टी-20 लिलावात मुख्तार कदी महागडा क्रिकेटपटू

Amit Kulkarni

साखळी नगराध्यक्ष अविश्वास ठराव सहमत

Omkar B

लॉकडाऊन हटले, कडक निर्बंध लादले!

Amit Kulkarni

चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

गोवा निवडणुकीसंदर्भात नवी दिल्लीत आढावा बैठक

Amit Kulkarni
error: Content is protected !!