तरुण भारत

पणजीत 22 पासून मारुतीराय संस्थान जत्रोत्सव

वार्ताहर / पणजी

मारुतीगड -मळा पणजी येथील श्री मारुतीराय संस्थानचा 90 वा जत्रोत्सव सोमवार दि. 22 ते गुरुवार दि. 25 रोजीपर्यंत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

सोमवार(दि. 22) पहाटे 5 वा. वाजल्यापासून धार्मिकविधींना सुरुवात होईल. त्यानंतर स. श्रीस अभिषेक, पुण्याहवाचन, मातुकापूजन, नंदीश्राद्ध, संग्रहमुख हनुमान मूलमंत्र जपयाग तद्नंतर 12.30 वा. पूर्णाहुती आशीर्वाद महाआरत्या व तीर्थप्रसाद होईल. संध्याकाळी 7 वा. श्री मारुतीरायाच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक श्री पांडुरंग देवालयातून सुरू होऊन मानसभाटपर्यत जाऊन परत मारुतीराय मंदिरात परत आगमन होणार आहे. त्याठिकाणी आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार 23 रोजी स. विविध धार्मिक विधी, रात्री 10.30 वा. मारुतीराय मंदिर परिसरात पालखी मिरवणूक कार्यक्रम, आरती, तीर्थप्रसाद व त्यानंतर पावणी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सीतामाई दैवज्ञ महिला मंडळ तिसवाडी पणजीच्या वतीने आशिष नागवेकर लिखित व दिग्दर्शित धमाल विनोदी नाटक ‘ खत खते’ सादर करण्यात येणार आहे.

बुधवार दि. 24 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी. रात्री 10. 30 वा श्रीची पालखी मिरवणूक आरती, प्रसाद व पावणी कार्यक्रम. त्यानंतर सुयोग रंगमंच, करमळी प्रस्तुत महेश नाईक लिखित शेखर आजगावकर दिग्दर्शित विनोदी ‘आता किते करपाचें’ हे  कोकणी नाटक सादर होणार आहे.

गुरुवारी 25 रोजी स. विविध धार्मिक विधी. रात्री 10. 30 वा. श्रीची पालखी मिरवणूक. आरती, प्रसाद, व पावणी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अभिनव पणजी प्रस्तुत महेश नाईक लिखित तसेच उमेश नायक दिग्दर्शित कोकणी नाटक ‘आवयचो पूत सुनेचेर भूत’ सादर करण्यात येणार आहे.

दि. 22 ते 25  या दरम्यान दररोज संध्या. मळा येथील झरीजवळ पावणी कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कारोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित राहावे व श्रीच्या दर्शनाचा तसेच कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मारुतीराय संस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

मडगाव आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

Patil_p

मजूरांना मिळाले मान्सूनपूर्व साफसफाईचे काम

Omkar B

आठ वर्षात वास्को शहराचा विकास रखडला

Patil_p

एमबीए, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना

Amit Kulkarni

मुरमुणे गुळेलीत पाणीपुरवठा सुरळीत करा

Amit Kulkarni

कोरोनाचा बाऊ करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे दुर्लक्षून चालणारे नाही

Patil_p
error: Content is protected !!