तरुण भारत

भारतात 12,881 नवे कोरोनाबाधित; 101 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासात 12 हजार 881 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 09 लाख 50 हजार 201 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 56 हजार 014 एवढी आहे. आतापर्यंत 94 लाख 22 हजार 228 जणांना लस देण्यात आली आहे. 

Advertisements


बुधवारी दिवसभरात 11,987 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 01 लाख 37 हजार 342 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 56 हजार 845 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आतापर्यंत देशात 20 कोटी 87 लाख 03 हजार 791 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 26 हजार 562 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.17 फेब्रुवारी 2021) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

मार्ग अनिश्चित काळासाठी रोखता येणार नाहीत

Amit Kulkarni

शबरीमला निदर्शनांशी संबंधित गुन्हे मागे घेणार

Amit Kulkarni

देशात 11,610 नवे बाधित, 100 मृत्यू

datta jadhav

5 व्या टप्प्यात 79 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 मार्चपर्यंत बंदच

Amit Kulkarni

सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी आशीर्वाद द्या !

Patil_p
error: Content is protected !!