तरुण भारत

हस्तोत्तानासनचे फायदे

डेस्क जॉब करणार्यांना कंबर दुखी, पाय दुखणे, पाठ, मान दुखणे यासारख्या तक्रारी नेहमीच उद्भवतात. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालयात नियमितपणे काही मिनिटे हस्तोत्तानासन करणे लाभदायक ठरु शकते.

  • सलग एकाच स्थितीत आणि समान उंचीवर बसल्याने आपल्या स्नायूवर ताण पडू शकतो. बसताना शरिराच्या वरच्या भागाचे वजन पाठीच्या कण्यावर पडते. त्यामुळे एकाच स्थितीत बराच काळ बसल्याने पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. अशावेळी आपण खुर्चीतून उठून दिवसभरात दोन-तीनदा दोन दोन मिनिटांचा वेळ काढून हस्तोत्तानासन केल्यास शरिरात रक्तप्रवाह चांगला राहू शकतो. परिणामी बॅकबोनला आराम मिळतो. या व्यायामामुळे शरिराच्या खालच्या भागात लवचिकपणा राहतो. तसेच पाठ, कंबर दुखीपासूनही आराम मिळतो.
  • हस्तोत्तानासन करण्याची पद्धत
  • हे आसन आपण कोठेही आणि कधीही करु शकता. हे आसन करण्यासाठी सर्वात अगोदर आपण सरळ उभे राहा आणि दोन्ही हातांना आकाशाच्या दिशेने न्या. आता दोन्ही हात एकत्र आणून टाच वर न्या. त्याचवेळी दोन्ही हात आणखी वर नेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर टाच जमीनीला टेकवा. आता दोन्ही हात वर ठेवत ऊजव्या बाजूला अधिकाधिक वाकण्याचा प्रयत्न करा. अशीच कृती डावीकडे वाकून करा. आपण दर दोन ते तीन तासांच्या अंतरांनी अशा प्रकारचे आसन करु शकता. 
  • या आसनामुळे शरिरातील रक्ताभिसरण चांगले होईल. सतत एकाच स्थितीत बसून काम केल्याने रक्तपुरवठा फारसा सुरळीत राहत नाही. ङयाखेरीज ऑफिसमध्ये रिफ्रेश योगाही करता येईल. यासाठी डोळे, जीभ, हातपायाचे कोपरे, कंबर, मान ही उजव्या-डाव्या बाजूला वळवा. हात-पाय खाली वर करत राहा. स्वतःला गोल-गोल फिरवा. अशा प्रकारे पायाच्या बोटांचाही व्यायाम करा. कान देखील हळू पिरगळा. संपूर्ण तोंड उघडून बंद करा. डाव्या हाताने उजवा खांदा आणि उजव्या हाताने डावा खांदा दाबा. ही कृती दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत करत राहा. त्यामुळे सांधेदुखी, स्नायूवरचा ताण, डोके दुखी, मानदुखी, कंबरदुखी, पाठीचे दुखणे, अपचन, गॅस यापासून सुटका मिळेल.

Related Stories

स्ट्रेस बॉलेचे आरोग्यलाभ

tarunbharat

जेष्ठांना धोका न्युमोनियाचा

Omkar B

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीला सुरुवात

datta jadhav

नटराजासन

Omkar B

झिकाचा धोका

Amit Kulkarni

काळजी ‘क्वारंटाईन’ व्यक्तींची

Omkar B
error: Content is protected !!