तरुण भारत

कॉव्हिडची लस घेताना

जवळपास एक वर्षाच्या कालखंडानंतर कोरोनाची दहशत कमी होत आहे. लसीकरण सुरू झाल्याने पुन्हा एकदा जनजीवन सामान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  भारतात एक नाही दोन लशींचे डोस दिले जात आहेत. पहिली कोव्हिशिल्ड आणि दुसरी कोव्हॅक्सिन.

  • काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटन आणि दक्षिण आफ्रेकेत दिसून आला. हा स्ट्रेन कोरोनापेक्षा 70 टक्क्याने अधिक घातक असल्याचे सांगितले गेले. मात्र केंद्र सरकारने दोन्ही लस नव्या स्ट्रेनवर परिणाम करणारी आहे, असे स्पष्टीकरण दिले.
  • साइडइफेक्टस् : लहान मुलांना देण्यात येणार्या बीसीजी लसीपासून रुबेलापर्यंतच्या लशीचे किरकोळ तात्कालिन परिणाम दिसून येतात. याप्रमाणे कोविड प्रतिबंधक लस दिल्यानंतरही त्याचे काही परिणाम आपल्या शरिरात दिसू शकतात.
  • लस दिल्याच्या ठिकाणी सूज येणे, हात दुखणे, डोके दुखणे, उलटी येणे अशा काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा ते एक तास त्या व्यक्तीला दवाखान्यातच थांबण्याचा सल्ला दिला जातो.
  • कोव्हिशिल्डची परिणामकता अन्य देशात 95 टक्के असताना भारतात मात्र 75 टक्के सांगितले जात आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे पोषण आहाराचा अभाव. त्यामुळे लस घेतल्यानंतर जे काही परिणाम दिसतील, ते अन्य व्यक्तीला सांगणे गरजेचे आहे.
  • कोविडचे लसीकरण सध्या प्राधान्यक्रमानुसार होत आहे. यात आरोग्य कर्मचार्यांबरोबरच ज्यांना या संसर्गाची बाधा होण्याची शक्यता अधिक आहे, अशा मंडळींना लस दिली जात आहे.
  • लस निर्मात्यांनी लशीसंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात म्हटले की, कमी रोगप्रतिकारक शक्ती असणारे आणि ऍलर्जीचा त्रास असणार्या मंडळींनी किंवा एखादे गंभीर आजारपण असेल तर लस घेण्याबाबत घाई करु नये. ङही लस केवळ 18 वर्षावरील मुलांसाठी आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना सध्या तरी कोविड लस न घेण्याचा सल्ला दिला आहे.

Related Stories

प्रदुषणानं घटतंय आयुर्मान

Omkar B

मेंदूला नाही म्हातारपण

Omkar B

आम आदमीच्या ‘गोवन्स अगेंस्ट करोना’ मोहिमेंतर्गत ऑक्सिमित्र उपक्रमास मांद्रे मतदार संघांत शुभारंभ

GAURESH SATTARKAR

क्लॉस्ट्रोफोबिया म्हणज काय ?

Omkar B

लेसर उपचारांचा दिलासा

Omkar B

शिशूचे मौखिक आरोग्य

tarunbharat
error: Content is protected !!