तरुण भारत

चेहऱ्यावर सूज येतोय

  • हार्मोनल बदल : पीरियडसच्या काळात शरिरात प्रोजेस्टेरोन हार्मोन वाढू शकतो. त्यामुळे पीएमएसच्या लक्षणाबरोबरच चेहरा देखील हुप्प दिसून येतो. महिलांत पीरियडच्या काळात ब्लोटिंग होते. या कारणांमुळे चेहरा सुजलेला दिसतो.
  • रात्री साखर आणि मीठाचे अधिक सेवन : अनियमित आहारामुळेही चेहर्यावर सूज येऊ शकते. रात्रीच्या जेवणात गोड किंवा मीठ अधिक खात असाल तर चेहर्यावरचे टिश्यू पाणी जमा करतात आणि त्यामुळे सकाळी सकाळी चेहरा सूजलेला दिसतो. चेहर्यावर सूज अधिक असेल तर पाणी अधिक प्यावे.
  • किडनीमुळेही सूज : किडनी आपल्या शरिरातून टॉक्सिन बाहेर काढते. जर शरिरातून घाण बाहेर जात नसेल तर हे टॉक्सिन शरिरातच जमतात. त्यामुळे संपूर्ण रात्रभर हे टॉक्सिन शरिरात असतात. परिणामी सकाळी एक ते दोन तास चेहरा सूजलेला दिसतो.

सूज कमी करण्याचे उपाय

  • फायबरचा समावेश करा : चेहर्यावरची सूज कमी करण्यासाठी आहारात फायबरचा समावेश करा. यात प्रामुख्याने पपईचा उल्लेख करता येईल. पपईमुळे पोट आणि आतडे आरोग्यदायी राहण्यास मदत मिळते. पपई खाल्ल्याने शरिर सडपातळ राहते. जीवनसत्त्व क, बीटा-कॅरोटिन आणि अँटिऑक्सिडेंटयूक्त असणारे पपई त्वचेवर पाणी जमण्यास रोखते.
  • वर्कआऊट करा : चेहर्यावरची सूज कमी करण्यासाठी वर्कआउट करा. कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग हे शरिरातील रक्ताभिसरण वाढण्यासाठी मदत करते. वर्कआऊट करताना आहार चांगला ंठेवा. व्यायाम करत असाल तर डबल चीन आणि जोलाइनवर लक्ष केंद्रीत करा.
  • मसाज करा : चेहर्यावरची सूज कमी करण्यासाठी हलक्या हाताने मसाज करा. यासाठी मॉइस्चराइजर तेलाचा उपयोग करा. संपूर्ण चेहर्यावर बोटांनी मसाज करावा.
  • मीठ कमी खाणे : चेहर्यावर सूज असेल तर आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा. मीठ हे शरिरात पाणी साठवते आणि त्यामुळे चेहर्यावर सूज येते. कार्बोनेटेड पेय घेण्यापासून दूर राहवे. पॅक्ड उत्पादनातील सोडियमची पातळी तपासून पाहवी. पन्नाशीच्या आतील वयोगटातील व्यक्तींसाठी 1500 मिलीग्राम मीठ पुरेसे आहे.

– डॉ. संजय गायकवाड

Advertisements

Related Stories

पर्याय ओटसचा

tarunbharat

मुलांमधील बध्दकोष्ठता

tarunbharat

मुलांमधील पाठदुखी

Amit Kulkarni

हाता पायाला मुंग्या येत आहेत

Amit Kulkarni

प्रोटिन्सचे सेवन कसासाठी

Amit Kulkarni

चीनमध्ये ‘कोरोना’ बळींची संख्या 2663 वर

tarunbharat
error: Content is protected !!