तरुण भारत

उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 61 वर; अजूनही 204 बेपत्ता

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 61 वर पोहचली असून, अजूनही 204 बेपत्ता आहेत. तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाखालील बोगद्यातून आणखी दोन मृतदेह हाती आले आहेत. या बोगद्यातून आतापर्यंत 13 मृतदेह सापडले आहेत.

Advertisements


चमोलीतील जोशीमठ येथे 7 फेब्रुवारीला हिमकडा कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 204 जण बेपत्ता होते.यासोबतच 56 कुटुंबीयांचे आणि 49 मृतदेहांचे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 


जिल्हाधिकारी एस भदौरिया यांनी सांगितले की, तपोवन बोगद्यातील ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातील मृतदेह पोस्टमॉर्टेमच्या ठिकाणी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जात आहेत. मृतदेह नातेवाईकांनी वेळेत न नेल्यास अशा मृतदेहांचा डीएनए जतन केला जात आहे.

Related Stories

मंत्री अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

Abhijeet Shinde

मध्यप्रदेशात भाजपची आघाडी

datta jadhav

जरंडेश्‍वर कारखान्याचा मालक कोण?, सोमय्यांचा अजित पवारांना सवाल

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 14,123 नवीन कोविड रुग्ण; 477 मृत्यू

Rohan_P

‘सीरम’कडून मुलांसाठीही कोरोना प्रतिबंधक लस

Patil_p

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!