तरुण भारत

चिमुरडय़ा ओजससाठी तातडीच्या मदतीचे आवाहन

ओजसवर होणार आहे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया : यकृत दानासाठी आईच सरसावली पुढे

  • शस्त्रक्रियेसाठी लागणार 25 लाख रुपये

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

Advertisements

सावंतवाडीतील कोलगाव-निरुखेवाडीचे रहिवासी प्रशांत राऊळ यांचा ओजस हा सात महिन्यांचा मुलगा यकृताच्या आजाराने आजारी आहे. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्याचावर उपचार सुरु आहेत. त्याचे प्राण वाचविण्यासाठी त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे. आईच्याच यकृताचा भाग त्याला बसविण्यात येणार असून, या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया, औषधे व इतर खर्च म्हणून 25 लाख रुपयांची गरज आहे. सिंधुदुर्गवासीयांनी आपणास जमेल तशी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन प्रशांत राऊळ यांच्यासह त्यांच्या मित्रांनी केले आहे. आपली छोटीशी आणि तातडीची मदत ‘ओजस’ला नवजीवन देऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर येथे एक कंपनीत जॉब करणाऱया कोलगावच्या प्रशांत राऊळचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले. सात महिन्यांपूर्वी त्यांना बाळ झाला. ओजस असे नामकरणही त्याचे करण्यात आले. ओजस दोन महिन्यांचा असताना त्याला यकृताचा त्रास जाणवू लागला, तो अत्यवस्थ होऊ लागला. त्याला मुंबईतील वाडिया इस्पितळात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिशय दुर्मिळ आजार असलेल्या या आजारातून मुक्तता करण्यासाठी त्याच्यावर केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. तब्बल पाच महिने तो वाडिया इस्पितळात दाखल होता. अखेर त्याला कोकिलाबेन इस्पितळात दाखल करण्यात आले. या इस्पितळात डॉक्टरनी ओजसचे प्राण वाचवायचे असतील, तर यकृत ट्रान्सप्लान करावे लागेल, असे सांगून त्यासाठी यकृत डोनर व शस्त्रक्रियेसाठी 20 लाखाचा खर्च येईल, असे सांगितले व हे सर्व तात्काळ करावे लागेल, असेही कळविले.

आतापर्यंत ओजसवर केलेल्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबियांकडचे होते-नव्हते ते सर्व संपले. ओजसचे प्राण वाचविण्यासाठी ओजसची आई पुढे सरसावली. तिने आपले यकृत ओजससाठी देण्याचे निश्चित केले. आता प्रश्न आहे तो शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी लागणारे 25 लाख आणायचे कुठून? हा. प्रशांतने यासाठी अनेक सेवाभावी ट्रस्ट, संस्था, बँकांकडे चौकशी सुरू केली आहे, अर्ज केले आहेत. भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आपल्या मित्रांकडे व सिंधुदुर्गवासीयांसमोरही मदतीसाठी हात जोडले आहेत. प्रशांतचे मित्रही त्याच्या मदतीकरीता पुढे सरसावले आहेत. त्यांना अनेक वॉटस्ऍप ग्रुप व फेसबूकवरून ओजसच्या मदतीसाठी आवाहन केले गेले आहे. ‘तरुण भारत’च्या माध्यमातूनही त्यांनी तमाम सिंधुदुर्गवासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे. ज्यांना ओजससाठी मदत करायची आहे, त्यांनी प्रशांत अंकुश राऊळ, खाते नं. 124701503066, IFSC CODE – ICICOOO1247 या वर मदत जमा करावी. गुगल-पेद्वारे मदत पाठवायची असल्यास 9404940045 किंवा 8855025945 या नंबरवर पाठवावी. अधिक माहितीसाठी गुरुदास राऊळ (9404940044) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

‘त्या’ बिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता : डॉ. नितीन राऊत

Rohan_P

पालघर हादरले…

amol_m

किल्ले सज्जनगड बुरुज स्वच्छता मोहीम फत्ते

Abhijeet Shinde

आंजर्ले समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू

Patil_p

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 37.70 मि.मी. पाऊस

Abhijeet Shinde

बोलक्या बाहुल्यातून शिक्षण आनंददायी करणारे ‘कला शिक्षक’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!