तरुण भारत

जगातील पहिला रोबोट चित्रकार

आरसा पाहून तयार करतो स्वतःचे चित्र

आई-दा म्हणजेच सुंदर दिसणारी महिला प्रत्यक्षात एक रोबोट आहे. केवळ रोबोटच नाही तर एक उत्तम चित्रकारही आहे. अलिकडेच आई-दाने एक कमाल केली आहे. आरशातील स्वतःचे प्रतिबिंब पाहून रोबोटने स्वतःचे चित्रच रेखाटले आहे.

Advertisements

आई-दा या रोबोटची निर्मिती करणाऱया लोकांनी याचे नाव 19 व्या शतकातील गणिततज्ञ अदा लवलेस यांच्यावर ठेवले आहे. हा जगातील पहिला अल्ट्रा-रियलिस्टिक रोबोट असून जो स्वतःचे डोळे आणि हातांच्या मदतीने चित्र रेखाटतो. आई-दाने स्वतःचे चित्र साकारण्यासाठी अलिकडेच स्वतःला आरशात पाहून यासंबंधीचे मोजमाप घेतले. त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने विश्लेषण केले आणि त्यानंतर स्वतःचे चित्र कॅनव्हासवर उतरविले आहे.

रोबोटच्या चित्रांचे प्रदर्शन आई-दा जगातील पहिला प्रोफेशनल ह्युमेनॉइट कलाकार असून जो स्वतःची कलाकृती स्वतःच तयार करतो. रोबोट आई-दाच्या चित्रांचे प्रदर्शन लंडनच्या डिझाइन म्युझियममध्ये मे किंवा जून महिन्यात आयोजित होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जीवन मिळून काय-काय केले जाऊ शकते हे यातून लोकांना समजणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav

दुबई विमानतळावर आता ‘डोळय़ांचा’ खेळ

Patil_p

तालिबानकडून सरकार स्थापनेसाठी पाक, चीनसह 6 देशांना निमंत्रण

datta jadhav

‘आयुष-64’ कोरोनावरील उपचारात प्रभावी

Patil_p

‘ट्रम्प हट्ट’: अमेरिकेची सुरक्षा धोक्यात

Omkar B

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!