तरुण भारत

पैशासाठी मुलानेच केला पित्याचा खून

दरजाईतील घटना उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : मुलासह दोन मित्र जेरबंद

प्रतिनिधी / सातारा

दरजाई (ता. खटाव) येथे मित्राच्या मदतीने बापाचा खून करणाऱया आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगांव पोलिसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद केले. पवन संपत सत्रे (वय 28, रा. दरजाई, ता. खटाव), सौरभ अशोक कदम ( वय 23 ), युवराज मोहन जाधव (वय 35) दोघेही रा. वडूज, ता. खटाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 17 फेब्रुवारी रोजी दरजाई (ता.खटाव) येथील शेतकरी संपत गुलाब सत्रे (वय 55) हे शेतातील काम संपवून आपल्या राहत्या घरी पायवाटेने चालत जात असताना अंधाराचा फायदा घेवून डोक्यात वार करून निर्जनस्थळी त्यांचा खून करण्यात आला होता. खूनानंतर अज्ञात आरोपींनी काही धागेदोरे मागे न सोडता घटनास्थाळावरून पलायन केले होते. दुसऱया दिवशी संपत सत्रे यांचा अंत्यविधी करण्यात आला. तरीसुध्दा आरोपींचा धांगपत्ता लागला नव्हता. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. 

गुह्याचा तपास कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे संयुक्तरित्या करत होते. पथकाने दरजाई व आजूबाजूच्या परिसरात बातमीदारांचा उपयोग करून खून झालेल्या संपत सत्रे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासून त्यांचा मुलगा पवन सत्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने वडिल शेतजमीन विकून पैसे देत नसल्याच्या कारणावरून मित्र सौरभ अशोक कदम व युवराज मोहन जाधव (वय 35) दोघेही रा. वडूज यांच्या मदतीने वडिल शेतातून घरी जात असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना त्यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारून खून केला. खूनानंतर वडिल घसरून पडून जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला असे भासविण्यासाठी त्यांच्या डोक्याखाली दगड ठेवण्यात आला, अशी माहिती सांगितले.

सौरभ अशोक कदम याला ताब्यात घेतला असता त्याने गुह्याची कबुली दिली. खूनाच्या घटनेनंतर चोवीस तासाच्या आत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिसांना यश आले असून तिघांच्यावर कलम 302 अन्वये पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक लोंढे- पाटील, सहाय्यक फौजदार तानाजी माने, पोलिस हवालदार सुधीर बनकर, पोलिस नाईक अर्जुन शिरतोडे, पोलिस कॉन्स्टेबल मयुर देशमुख, संकेत निकम, संजय जाधव, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदराव जगताप, पोलिस हवालदार चंद्रहार खाडे, सचिन खाडे, आनंदराव गमरे, पुष्कर जाधव, सचिन जगताप, सचिन माने, गणेश मुंडे, इम्तियाज मुल्ला यांनी सहभाग घेतला.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील 422 जणांना डिस्चार्ज; 1134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

triratna

आराधना गुरव यांना साहित्यरत्न पुरस्कार

Patil_p

रेठरे बुद्रूक, येथील विकास सेवा सोसायटीच्या खत विभागात २३ लाखांचा अपहार

triratna

कराडला वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता रॅली

Patil_p

सायकलवरून भारत भ्रमंती करणारा सातारचा अवलिया

Shankar_P

मेढय़ातन सुरु झाल अन् वाढय़ात संपल

Patil_p
error: Content is protected !!