तरुण भारत

गुगल लहान-मध्यम कंपन्यांना 7.5 कोटी डॉलर्सचा निधी देणार

गुगल लहान-मध्यम कंपन्यांना 7.5 कोटी डॉलर्सचा निधी देणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

गुगल कोविड-19 च्या अडचणीमधून प्रवास करणाऱया लॅटिन अमेरिका आणि आशियातील लहान व मध्यम कंपन्यांना साडेसात कोटी डॉलर्सचा निधी देणार  असल्याची माहिती आहे. अल्फाबेट इंकच्या युनिटसाठी युरोपियन इन्वेस्टमेंट फंड (इआयएफ) यांच्या व्यतिरिक्त दोन्ही महाद्वीपांमधील संघटनांसोबत करार करण्यात आला आहे.

निधी देण्याचे नियोजन कोविड-19च्या विरोधात मागील मार्चपासून  सुरु असलेल्या अभियानाचा एक भाग असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. यासह भारतीय कंपन्यांना दीड कोटी डॉलर्स इतका निधी देणार असल्याचे संकेत आहेत.

गुगलने बुधवारी म्हटले आहे, की दोन युरोपीयन इन्वेस्टमेंट फंडमध्ये पैसा घातला जाणार आहे. याच्या मदतीने 1000 लहान युरोपीयन कंपन्यांना दीड कोटी डॉलर्सचा निधी देण्यात येणार आहे. तसेच 200 लाईफ सायन्सेज कंपन्यांना सपोर्ट देणाऱया इआयएफला एक कोटी डॉलर देणार आहे.

भारतीय कंपन्यांना दीड कोटी डॉलर्स

लॅटिन अमेरिकेमध्ये गुगल इंटर अमेरिकन डेव्हलपमेंट बँकेसोबत काम करणार आहे आणि लहान कंपन्यांना 80 लाख डॉलर्सचे कर्ज देणार आहे. त्यांनी आफ्रिका, खाडी देश आणि इंडोनेशियातील कंपन्यांना मदत करण्यासाठी 2.6 कोटी डॉलर्सचा निधी उभारला आहे.

Related Stories

मास्टरकार्डवर लागले निर्बंध

Amit Kulkarni

जुलैमध्ये रत्ने-आभूषणांची निर्यात 38 टक्क्यांनी घटली

Patil_p

गेट्स फाउंडेशनमधून वॉरेन बफे बाहेर पडणार

Amit Kulkarni

महामारीमुळे जागतिक पर्यटन क्षेत्र नुकसानीत : संयुक्त राष्ट्र संघ

Patil_p

जूनमध्ये किरकोळ विक्री घटली

Patil_p

स्मार्टफोन शिपिंगमध्ये पाच शहरांची हिस्सेदारी

Patil_p
error: Content is protected !!