तरुण भारत

‘एफपीआय’ची 2.5 लाख कोटींची गुंतवणूक

वर्ष 2020-21 मधील आकडेवारीचा समावेश : फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातून अधिकची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांकडून(एफपीआय) चालू आर्थिक वर्षात (2020-21) मध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. सदरचा आकडा 15 फेब्रुवारीपर्यंत 33.8 अब्ज डॉलर (जवळपास 2.54 लाख कोटी) च्या घरात पोहोचला आहे. केअर रेटिंगच्या अहवालानुसार भारतामध्ये विदेशी गुंतवणूकदारांकडून एकूण 592.5 अब्ज डॉलर (42.96 लाख कोटी) गुंतवणूक आली आहे.

उपलब्ध अहवालानुसार एकूण गुंतवणूकदारांची मोठी हिस्सेदारी शेअर बाजारात राहिली आहे. यामध्ये देशातील गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात आतापर्यंत 537.4 अब्ज डॉलर आणि डेट मार्केट म्हणजे बॉण्ड मार्केटमध्ये 51.38 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीसाठीच्या क्षेत्राचा विचार केल्यास यामध्ये फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रात जास्त झाली आहे. यामध्ये 191.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली असून या व्यतिरिक्त सॉफ्टवेअर, ऑईल ऍण्ड गॅससह विमा क्षेत्रातील 10 गुंतवणूक क्षेत्राचाही यामध्ये समावेश राहिला आहे.

देशामध्ये विदेशी गुंतवणूकदारांची (एफपीआय) एकूण गुंतवणुकीमध्ये या 10 क्षेत्राची हिस्सेदारी 78 टक्के आहे. विशेषबाब म्हणजे चालू आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांनी सर्वाधिक 8.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक डिसेंबरमध्ये केली आहे. ज्यामध्ये हा आकडा जवळपास 34 अब्ज डॉलर झाला आहे. गुंतवणूकदारांनी 2014-15 मध्ये जवळपास 45.7 अब्ज डॉलर इतकी सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.

गुंतवणूकदारांमध्ये अमेरिका अव्वल

एकूण गुंतवणुकीमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी सर्वाधिक 34 टक्के आहे. यासह मॉरिशस, 11, सिंगापूर 8.8, लक्जमबर्ग 8.6, ब्रिटन 5.3, आर्यलँड 4, कॅनडा 3.4, जपान 2.8, नेदरलँड 2.4 आणि नॉर्वे यांची 2.4 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.

Related Stories

टाटा समूहाचे सुपर ऍप डिसेंबरला होणार सादर

Patil_p

क्षेत्रीय ग्रामीण बँकांना चालू आर्थिक वर्षात 2,206 कोटीचा तोटा

Patil_p

चढउताराच्या प्रवासात सेन्सेन्स मजबूत

Amit Kulkarni

रिलायन्सकडून मनिष मल्होत्राच्या कंपनीत हिस्साखरेदी

Patil_p

शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला कायम

Patil_p

इंडियन ऑइलचा निव्वळ नफा दहापट वाढला

Patil_p
error: Content is protected !!