तरुण भारत

व्होडाफोन आयडीयाचा तोटा झाला कमी

नवी दिल्ली

 खासगी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाला तिसऱया तिमाहीअखेरच्या एकत्रित तोटय़ात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 31 डिसेंबर 2020 संपलेल्या तिमाहीअखेर कंपनीला 4 हजार 532 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षाआधी कंपनीने समान कालावधीमध्ये 6 हजार 438 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. त्या तुलनेत सध्याचा तोटा हा काहीसा दिलासादायक म्हणायला हवा. इंडस टॉवर्सच्या भारती इंन्फ्राटेलसोबत व्होडाफोनचे विलीनीकरण होणार असून यातील 11 टक्के इतका वाटा 3 हजार 760 कोटी रुपयांना विकणार आहे. ग्राहक जोडण्यात मात्र कंपनीने चांगले प्रदर्शन केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

आयशर मोटर्सच्या नफ्यात 40 टक्के घट

Omkar B

तिसऱया दिवशी सेन्सेक्सचा टप्पा 39 हजार पार

Patil_p

सलग सहा दिवसांच्या तेजीला अखेर विराम !

Patil_p

बाजाराचा कल उत्साहाकडे; पण

Omkar B

आयसीआयसीआयकडून व्हॉट्सऍप बँकिंग सेवा सुरू

tarunbharat

टीसीएसला तिमाहीत 7,475 कोटींचा नफा

Patil_p
error: Content is protected !!