तरुण भारत

पिरामलला मिळाला हिरवा कंदील

मुंबई

 कर्जाच्या बोज्याखाली वावरणाऱया डीएचएफएल कर्ज वितरण करणाऱया संस्थेवर ताबा मिळवण्याच्या प्रक्रियेला पिरामलला रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदील दाखवला असल्याचे समजते. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पिरामलच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पिरामलला डीएलएफएलचे अधिग्रहण करणे सहज शक्य होणार आहे. मंजुरीनंतर डीएचएफएलचे समभाग शेअर बाजारात 4 टक्के इतके वाढले होते. डीएचएफएलला डिसेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत 13 हजार 95 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सप्टेंबर 2020 ला संपलेल्या दुसऱया तिमाहीत कंपनीचा तोटा 2 हजार 122 कोटी रुपये होता.

Advertisements

Related Stories

टोटलकडून अदानी ग्रीनमध्ये हिस्सा खरेदी

Patil_p

एनटीपीसी-ओएनजीसी यांच्यात करार

Patil_p

ऍक्सिस बँकेला 1,683 कोटींचा नफा

Patil_p

साखर उत्पादन 12 टक्क्मयांनी वाढणार ?

Patil_p

एलआयसी हाऊसिंगकडून व्याजदरात कपात

Patil_p

जेफ बेजोस फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी

Patil_p
error: Content is protected !!