तरुण भारत

सलग चौथे सत्र घसरणीसोबत बंद

सेन्सेक्स 434.93 तर निफ्टी 137 अंकांनी प्रभावीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील भारतीय भांडवली बाजारातील प्रवास हा सलग चौथ्या सत्रात घसरणीसह बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 434.93 अंकांनी घसरुन निर्देशांक 50,889.76 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 137.2 अंकांनी प्रभावीत होत 14,981.75 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

मागील चार सत्राच्या कामगिरीत 1,264 अंकांनी सेन्सेक्स घसरला आहे. 15 फेब्रुवारी रोजी 609 अंकांनी वाढून 52,154.13 वर बंद झाला होता. महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे मोठय़ा प्रमाणात गुंतवणूकदार अस्थिर झाल्याचे चित्र दिसून आले असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभाग प्रमुख एस रंगनाथन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

भारतीय शेअर बाजारामध्ये मागील चार दिवस सुरु असणाऱया नफा कमाईमध्ये सरकारी बँकांच्या समभागांची सर्वाधिक खरेदी झाल्याचे दिसून आले. यामध्ये पीएसयु बँकांचा निर्देशांक सर्वाधिक 10.7 टक्क्यांनी वधारला होता. दुसऱया बाजूला औषध आणि वाहन क्षेत्रातील गुंतवणूकदार मात्र निराश झाले होते. कारण दोन निर्देशांकांनी आठवडय़ात 3 टक्क्यांची जादाची घसरण नोंदवली आहे.

सलगची तेजी प्राप्त करत प्रवास करणारा शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या नफा कमाईमुळे प्रभावीत झाला आहे. येत्या आठवडय़ाच्या सुरुवातीला समभाग खरेदी परतल्यास निफ्टी आणि सेन्सेक्स पुन्हा तेजी प्राप्त करण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.

समभागांची 61 टक्क्यांची घसरण

एक्सचेंजमध्ये 3,131 समभागांमध्ये ट्रेडिंग झाले आहे. यामध्ये 1,182 समभाग तेजीसोबत तर 1,779 हे मात्र घसरणीसोबत बंद झाले आहेत. लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य घटून 203.98 लाख कोटी रुपयावर आले आहे. 18 फेबुवारी रोजी हा आकडा 205.93 लाख कोटीवर होता.

जागतिक पातळीवर विक्री

जगभरातील मुख्य शेअर बाजारांमध्ये शुक्रवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. यामध्ये जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे.

Related Stories

वर्क फ्रॉम होम मोहिमेतून होतेय बचत

Patil_p

फ्लिपकार्ट होलसेलची 12 नव्या शहरात एंट्री

Patil_p

वाहन नोंदणीत ऑगस्टमध्ये 15 टक्क्यांची वाढ

Amit Kulkarni

‘टीसीएस’चा नफा 15 टक्क्यांनी वाढला

Patil_p

‘हिरो’चा नफा 865 कोटी च्या घरात

Patil_p

स्टेट बँकच्या योनो ऍपवर मिळणार विशेष ऑफर

Patil_p
error: Content is protected !!