तरुण भारत

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे सात रूग्ण वाढले; पाच कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सांगली

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच विदर्भामध्ये मोठÎा संख्येने कोरोना रूग्ण वाढत चालले आहेत. पण सांगली जिल्ह्यात मात्र रूग्णवाढीचा दर हा स्थिर आहे. शुक्रवारी अवघे सात नवीन रूग्ण वाढले आहेत. तर पाच रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाही मृत्यूची नोंद नाही.

कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणून लोकांच्या मनात एकप्रकारची भीती बसली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण जिल्ह्यात मात्र शुक्रवारी अवघे सात रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात तीन रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात दोन आणि मिरज शहरात एक रूग्ण वाढला आहे. तर ग्रामीण भागात चार रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कडेगाव, खानापूर तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. जत तालुक्यात एक आणि शिराळा तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे.

वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, पलूस आणि तासगाव तालुक्यात नवीन एकही रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात सध्या उपचारात अवघे 120 रूग्ण आहेत. त्यातील निम्मे रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. रूग्णालयात उपचार घेत असणाऱयांच्यामध्ये 27 रूग्णांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. शुक्रवारी उपचार सुरू असणारे पाच रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 48 हजार 332 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील 46 हजार 457 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हÎाचा कोरोना रिकव्हरी रेट हा 96 टक्केपेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यात आजअखेर एक हजार 755 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हÎाचा कोरोनाचा मृत्यूदर हा 3.65 टक्के इतका आहे. हा देश आणि राज्यापेक्षा अधिक आहे.

नवे रूग्ण 07
उपचारात 120
बरे झालेले 46457
एकूण 48332
मृत्यू 1755

Related Stories

पैसे मोजण्याचा बहाणा करून वृद्धेला 14 हजारांचा गंडा

triratna

अग्निशमनकडून एसएफसी मॉलमध्ये मॉगड्रिल

triratna

सांगली : कुंडलमध्ये क्रांतीअग्रणींना अभिवादन

triratna

कुपवाडच्या फौंड्रीतून कास्टींग चोरणाऱ्या दोघांकडून सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

triratna

सांगली : रेल्वे ‘ट्रॅकवर’ पाटबंधारे ‘धारेवर’

triratna

आघाडीची सरशी, भाजप नंबर वन!

triratna
error: Content is protected !!