तरुण भारत

इचलकरंजीच्या महावितरण विभागीय कार्यालयात तोडफोड

कोल्हापूर/ प्रतिनिधी

वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी एका औद्योगिक ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात गजानन जाधव सह इतर १५ ते २० जणांनी धुडगूस घालून तोडफोड केली. महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह एका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व मारहाणही केली. संबंधिताविरुद्ध इचलकरंजी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वारंवार विनंती, पाठपुरावा व आवाहन करूनही वीज बील न भरलेल्या ग्राहकांचा नियमानुसार सूचना देऊन वीज पुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात येत आहे. सदर ग्राहकास भारतीय विद्युत कायदा २००३, कलम ५६(१) नुसार माहे नोव्हेंबर २०२० या महिन्याच्या ०७ डिसेंबर २०२० च्या देयकाची ७ लक्ष ६७ हजार २९२ रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी १५ दिवसाच्या मुदतीची दि. १२ जानेवारी २०२१ रोजी बाजाविण्यात आली होती.

दरम्यान इचलकरंजी शहरातील एका औद्योगिक ग्राहकाचा वीज पुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात आल्यानंतर त्याचा राग मनात धरून गजानन जाधव , स्वप्नील जाधव, सचिन खाडे सह इतर १५ ते २० अनोळखीनी महावितरण कार्यालयात येऊन लोखंडी रॉड, काठ्या, फावडे इ. हत्यारे आदी साहित्य वापरून कार्यालयात तोडफोड करून महावितरणचे अंदाजे २ लक्ष रुपयांचे नुकसान केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता विकास भारद्वाज, कर्मचारी भूषण कोळप यांना धक्काबुक्की व मारहाण केली.

शासकीय कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान व शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता विकास भारद्वाज यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनूसार संबंधिताविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १४३,१४७, १४८, १४९ ,२७०,२७१, ३५३, ३३२, ३३७, ४५२, ४२७, ५०४, ५०६ , सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ व ७, फौजदारी कायदा दुरुस्ती कलम ७ प्रमाणे तसेच साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २,३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापूर : वन समितींच्या दोषींवर कारवाई करणार – आ. आबिटकर

Shankar_P

रहोबोथ सेवा संस्थेची पेठ वडगाव नगरपालिकेस औषधांची मदत

triratna

कोल्हापूर : परप्रांतीय व्यापाऱ्याचा गडहिंग्लजकरांना ४० लाखांचा चुना

triratna

विधीशाखेचे पेपर मराठी भाषेमध्ये घ्यावेत : मनसे

triratna

सरकारी व्हेंटिलेटरची खासगी हॉस्पिटलना खिरापत

triratna

३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत आळतेत १० हेक्टर क्षेत्रातील ९८ टक्के वृक्ष जिवंत

triratna
error: Content is protected !!