22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

पँगाँगमधील सैन्यमाघार पूर्ण

कमांडर पातळीवर आज महत्त्वपूर्ण बैठक – तणाव निवळण्याच्या दिशेने मार्गक्रमण

लडाख, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पँगाँग सरोवराच्या दोन्ही बाजूंनी सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांनी निर्धारित वेळेच्या आधीच सैन्य आणि सामुग्री हलविल्यानंतर आता शनिवारी (आज) भारत आणि चीन यांच्यात कमांडर पातळीवरील महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 10 वाजता पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱयावरील चुशुलजवळील मोल्डो येथे पार पडणार आहे. या बैठकीत पुढील पवित्र्याबाबत नियोजन आणि चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांनी पँगाँग सरोवराच्या दोन्ही बाजूने सैन्य, तोफा व इतर उपकरणे अन्यत्र हलविली आहेत. सैन्यमाघारीमुळे गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेला दोन्ही देशांमधील तणाव कमी होऊ लागला आहे. आतापर्यंत भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱयांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱया पार पडल्या आहेत. या चर्चेच्या फलनिष्पत्तीतूनच सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापूर्वीच सैन्यमाघार पूर्ण झाल्यानंतर पुढील बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी घातलेल्या अटींनुसार सैन्यमाघार झाली की नाही याची शहानिशा शनिवारी होणाऱया बैठकीमध्ये केली जाऊ शकते. तसेच या बैठकीत दोन्ही देशात देपसांग, हॉट स्पिंग्ज आणि गोगरा येथील सैन्य माघारीसंबंधी चर्चा होऊ शकते.

वर्षभरानंतर तणाव निवळला

हटवण्यात आलेल्या छावण्या गेल्या जानेवारीपासून तेथे उभारण्यात आल्या होत्या. गेल्यावषी एप्रिलमध्ये दोन्ही देशातील तणावाला अधिक व्यापकपणे सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी दहा महिने एकमेकांसमोर ठाकल्यानंतर अखेर हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या छायाचित्रांनुसार चिनी लष्करी छावण्या हटवल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी जारी केलेल्या व्हिडीओ आणि छायाचित्रानुसार चिनी सैनिक माघारी फिरत असून, ट्रकमधून ते जात असल्याचे दिसत आहे. चीनकडून सैन्यमाघार झाल्यामुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव निवळल्याचे सध्यातरी चित्र आहे.

आता इतर प्रश्न सोडविण्यासाठी बैठक

दोन्ही देशांनी पँगाँग सरोवरापासून माघार घेण्याचे मान्य केले होते. या सैन्य माघारीनंतर लडाखमध्ये सुरू असलेले इतर प्रश्न सोडविण्यासाठी लष्करातील वरि÷ अधिकाऱयांची बैठक पार पडेल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडेच संसदेत दिली होती. सध्या सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये भारताचे काहीही नुकसान होन नसल्याचा दावाही करण्यात आला होता.

चीनचा कबुलीनामा

गलवानमधील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे अखेर चीनने कबूल केले आहे. चीनच्या ‘पीपल्स डेली’ने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि जूनमध्ये शहीद झालेल्या चार सैनिकांचा गौरव केला आहे. या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ‘ग्लोबल टाईम्स’च्या वृत्तानुसार गलवान व्हॅलीत पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. या संघर्षात चिनी सैनिकही मरण पावल्याचे सांगितले जात होते. मात्र, चीनने याबाबत अद्यापपर्यंत कधीही त्याबाबत कबुली दिली नव्हती. शुक्रवारी पहिल्यांदाच चीनने याबाबत कबुली दिली. ठार झालेल्या सैनिकांना चीनने मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्याने ही माहिती समोर आली आहे. 15 जून 2020 रोजी मध्यरात्री गलवानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताप्रमाणेच चिनी लष्कराचेही सैनिक मारल्या गेल्याचे वृत्त होते. मात्र चीनने आपले सैनिक मारल्या गेल्याची जाहीर कबुली दिली नव्हती. मात्र आता दिलेल्या कबुलीमुळे त्यावरील पडदा अखेर दूर झाला आहे. 

Related Stories

जम्मू काश्मीर : माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण

pradnya p

कृषी क्षेत्रासाठी 16.6 लाख कोटी

Patil_p

न्यायमूर्ती एनव्ही रमन्ना देशाचे नवे मुख्य न्यायाधीश

datta jadhav

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 83 लाख 64 हजार 086 वर

pradnya p

पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये कपात शक्य

Patil_p

बिहारमध्ये 581 नवे कोरोना रुग्ण; 7 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!