तरुण भारत

सलग 11व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 33 पैशांनी महागले आहे. यासोबतच दिल्लीत पेट्रोलच्या दराने 90 चा आकडा गाठला असून लोकांना प्रतिलिटरमागे 90 रुपये 19 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेल 80 रुपये 60 पैसे प्रतिलिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96 रुपये 62 पैसे आणि डिझेलचा दर 87 रुपये 67 पैसे इतका झाला आहे. बेंगळूरमध्ये पेट्रोलसाठी 93 रुपये 21 पैसे आणि डिझेलसाठी 85 रुपये 44 पैसे मोजावे लागत आहेत.

Advertisements

वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत अडकले असून वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. देशात आता बहुतांश सर्वच राज्यांमध्ये पेट्रोलने नव्वदीचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्यप्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या किंमती 63 अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढल्यामुळे इंधनाचे दर भडकल्याचा दावा केला जात आहे.

Related Stories

‘जमात’च्या कार्यक्रमात सहभागी झालेले बिदरमधील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

सुशांत आत्महत्या : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून

Rohan_P

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

चारधाम यात्रेवरील स्थगिती हटली

Amit Kulkarni

देशात कोरोना बाधितांचा 19 लाखांचा टप्पा पार

Patil_p

भारतविरोधी विधेयक नेपाळमध्ये संमत

Patil_p
error: Content is protected !!