तरुण भारत

दिशा रवीला 3 दिवस न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या कोठडीमध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पतियाला न्यायालयाच्या आदेशानुसार तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने दिशाला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यापूर्वीची मुदत संपल्यामुळे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिशा रवीला पतियाला न्यायालयासमोर हजर केले होते. दिल्ली पोलिसांनी 15 फेब्रुवारी रोजी दिशा रवीला बेंगळूरमधील तिच्या घरातून अटक केली होती. गेल्या पाच दिवसात पोलिसांनी विविध मार्गांनी तपास करत अनेक पुरावे गोळा केले आहेत. दिशा रवीच्या मोबाईलमधील सोशल मीडिया माध्यमांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा केला जात आहे.

Advertisements

Related Stories

भारतात २३७ अब्जाधीश; अदानी कुटुंबाने सर्वाधिक कमावले; दिवसाला १ हजार २ कोटी

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेश : एप्रिल – मे महिन्याचे लाईट बिल न भरणाऱ्यांचे तोडणार कनेक्शन

Rohan_P

मे महिन्यात निर्यातीत लक्षणीय वाढ

Patil_p

सरकारच्या आदेशाशिवाय खाजगी शाळांनी फी वाढवल्यास होणार कारवाई : मनीष सिसोदिया

prashant_c

भारत-चीन कमांडर स्तरावरील चर्चेची 14 वी फेरी सुरू

datta jadhav

लॉकडाऊन हा अगदी शेवटचा पर्याय

Patil_p
error: Content is protected !!