तरुण भारत

अन् शाहु कलामंदिर झाले रंगकर्मीच्या सेवेत दाखल

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी तब्बल आठ दिवस स्वतः उभे राहून घेतले काम करु

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

तब्बल दीड वर्ष साताऱयाचे शाहु कलामंदिर हे बंद अवस्थेत होते. ते सुरु करण्यासाठी सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतः लक्ष घालून खासदार उदयनराजे यांच्या सुचनेनुसार काम करुन घेतले. दररोज तब्बल चार तास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे येवून काम करुन घेत होते. त्यामुळेच आजचा पहिला नाटकाचा प्रयोग सातारकरांना पालिकेच्या शाहु कलामंदिरात पहायला मिळाला. एवढय़ावर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे थांबले नाहीत तर त्यांनी कमानी हौदाच्या नुतनीकरणाचेही काम करत आजपासून कमानी हौदातला रंगीत कारंजा खुला करण्यात आला आहे. 

सातारा पालिकेच्या मालकीचे असलेले शाहु कलामंदिर हे दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या दीड वर्षापासून बंद अवस्थेत आहे. हे शाहु कलामंदिर सुरु कधी होणार याकडे सगळय़ांच्या नजरा होत्या. रंगकर्मी तर आम्हाला लवकरच शाहु कलामंदिर सुरु करुन मिळावे अशी वारंवार मागणी करत होते. खासदार उदयनराजे यांनी त्याबाबतच्या सुचना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिल्या. त्यांनी त्यांच्या सुचनेनुसार पालिकेत यंत्रणा फिरवुन कामाला सुरुवात केली. दररोज या कामाकरता दररोज चार तास वेळ देत होते. स्वतः उपनगराध्य2ा मनोज शेंडे हे पालिकेत येवून कामाच्या ठिकाणी जावून सुचना देत काम पूर्ण करुन घेण्याच्या मागे तगादा लावत होते. त्यामुळेच आजच्या प्रयोगासाठी हे शाहु कलांमदिरासाठी ख्gाले झाले आहे. तसेच कमानी हौद येथील कारंजाचे काम करुन घेतले. कमानी हौद परिसर स्वच्छ करण्यात आला. आजही तोही कारंजा खुला करण्यात आला.

Related Stories

जनमानसात कमालीची अस्वस्थता; छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा

Rohan_P

विकासकामांबाबत अजितदादा राजकारण करत नाहीत: आमदार शिवेंद्रराजे

Abhijeet Shinde

सासऱयाने जावयाच्या अंगावर घातली गाडी

Patil_p

कोयना धरणात 90.88 टीएमसी पाणीसाठा

Patil_p

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला वेबिनावर संवाद

Abhijeet Shinde

राज ठाकरेंनी ‘या’ कारणासाठी मानले पीएम मोदींचे आभार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!