22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात 6,112 नवे रुग्ण, 44 मृत्यू

  • राज्यात 44,765 ॲक्टिव्ह रुग्ण 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 87 हजार 632 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 713 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 2,159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 89 हजार 963 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 44 हजार 765 रुग्ण उपचार घेत आहेत. 


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 55 लाख 88 हजार 324 नमुन्यांपैकी 20 लाख 87 हजार 632 (13.39%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 2 लाख 24 हजार 087 क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 588 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

जिल्हाबंदी आदेशाचा भंग करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

सांगली : शिराळ्यात ७५ ते १०० बेडची व्यवस्था करा : जिल्हाधिकारी चौधरी

triratna

चिनी सैन्यांकडून पाच भारतीयांचे अपहरण

datta jadhav

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात

triratna

जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंचे व्हॉट्सॲप स्टेटस

pradnya p

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांना जामीन मंजूर

pradnya p
error: Content is protected !!