तरुण भारत

संगीता बांदेकर-कुलकर्णी यांच्या संमिश्र गायनाचा आज कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

संगीत कलाकार संघ व स्वर मल्हार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 20 रोजी अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात गायिका संगीता बांदेकर-कुलकर्णी यांच्या संमिश्र गायनाचा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. त्यांना सारंग कुलकर्णी संवादिनीची तर अंगद देसाई तबल्याची साथ करणार आहेत. 

Advertisements

संगीता यांचा परिचय पुढीलप्रमाणे

संगीता बांदेकर (कुलकर्णी) या बेळगावच्याच असून वडील नागेश बांदेकर रेडिओ स्टार व संगीतकार असल्याने त्यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर तम्मण्णा गुरव मृत्यूंजय बुवा पुराणिक मठ व जोशी बुवा पाच्छापूरकर यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका आहेत. वडिलांच्या अनेक रचना दूरदर्शनवरून गाण्याची संधी त्यांना मिळाली.

वाङ्मय चर्चा मंडळ प्रस्तुत ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशय कल्लोळ’, हाच मुलाचा बाप, संगीत भ्रमाचा भोपळा या नाटकांतून त्यांनी कामे केली. दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र नाटय़ स्पर्धेत सतत तीन वर्षे उत्कृष्ट गायिक व अभिनेत्रीचे पारितोषिक मिळविले. काही चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. भारतासह परदेशात त्यांच्या गायनाचे शो झाले आहेत. अनुप जलोटा, सुदेश भोसले, अनुराधा पौडवाल, रविंद्र साठे, ना. धो. महानोर, उषा उत्तप यांच्या समवेत त्यांनी शो केले आहेत. 12 वर्षे पुणे येथे वास्तव्य करून त्या बेळगावला परतल्या आहेत.

Related Stories

लोकमान्य मिलिटरी टेनिंग ऍकॅडमी नवी बॅच लवकरच

Amit Kulkarni

टेम्पो-दुचाकी अपघातात भिवशीचा तरुण ठार

Patil_p

निपाणीत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

Patil_p

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

Patil_p

जलसंवर्धन ही काळाची गरज

Amit Kulkarni

स्मार्ट रस्त्याच्या काँक्रिटीकरणात गायब झाले चेंबर

Patil_p
error: Content is protected !!