तरुण भारत

चापगाव श्री फोंडेश्वर मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी

वार्ताहर / चापगाव

चापगाव (ता. खानापूर) येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या श्री फोंडेश्वर मंदिराचा उद्घाटन समारंभ 27 रोजी आयोजिला आहे. सदर उद्घाटनाची जय्यत तयारी जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

Advertisements

यानुसार दि. 25 फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उत्सवाची सांगता दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या फोंडेश्वर देवस्थानची वार्षिक यात्रा माघ पौर्णिमेला होते. या यात्रोत्सवाचे औचित्य साधून सदर मंदराचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याकरिता चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. 25 रोजी सकाळी वास्तुशांती, होमहवन व दुपारी 12 वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 26 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी दुपारी 3 वाजता श्रींचा पालखी सोहळा निघणार आहे. या समवेत नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरातील बैठकीच्या प्रभावळीची मिरवणूक होणार आहे. सायंकाळी 6 वाजता मंदिराच्या आवारात पालखी पोहोचेल. यानंतर सायंकाळी 7 वाजता मंदिर आवारात संत साहित्यावर गडहिंग्लज घाळी महाविद्यालयाचे प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता इंगळय़ांचा कार्यक्रम होणार आहे. व रात्री हरी जागर होणार आहे.

शनिवारी मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम

शनिवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित केले आहे. मंदिराचे उद्घाटन गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अरविंद पाटील, जि.पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी यांच्या हस्ते होणार आहे. गाभारा उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर, विधान परिषद सदस्य विवेक पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजप नेते शरद केशकामत आदींच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला तालुक्मयातील विविध पक्षांचे नेतेमंडळी, संघटनांचे कार्यकर्ते व सर्व देणगीदारांना निमंत्रित केले आहे. दुपारी 3 वाजता सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 9 वाजता हभप विठ्ठल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 28 रोजी सकाळपासून देवाच्या ओटी भरणे व नवस फेडणे कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता श्रीचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार कमिटीने केले आहे.

Related Stories

प्रश्नमंजुषा माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न

Patil_p

पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने विविध भागात पाणी नाही

Patil_p

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा

Patil_p

जिल्हय़ाला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा

Amit Kulkarni

मिरचीचा ठसका झाला कमी

Patil_p

दहावीच्या निकालातील घसरण भरून काढण्यासाठी प्रयत्न आवश्यक

Amit Kulkarni
error: Content is protected !!