तरुण भारत

अभिनेता विवेक ओबेरॉय विरोधात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यावर मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेल्मेट आणि मास्कविना बाइक चालवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हॅलेंटाइन डे ‘ला विवेक ओबेरॉयने बाइकवरून पत्नीला सैर केली होती आणि त्यानंतर याबाबतचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यात विवेकने हेल्मेट घातलेले नव्हते, तसेच चेहऱ्याला मास्कही लावला नव्हता, याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी आज कारवाईचे पाऊल उचलले आहे. 


सांताक्रूझ वाहतूक विभागातील पोलीस हवालदार संभाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेक ओबेरॉयवर भारतीय दंड विधानाची विविध कलमं, मोटर वाहन कायदा व महाराष्ट्र कोविड- 19 उपायोजना 2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.


दरम्यान, विवेक ओबेरॉयचा हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनू वर्गीस यांनी ट्वीटरवर पोस्ट केला व त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विवेकने हेल्मेटविना बाइक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे. तसेच मास्क न घातल्याने तोही नियमभंग ठरतो. यातून युवा पीढीसमोर चुकीचा संदेश जात असल्याचे वर्गीस यांनी नमूद केले होते.

वर्गीस यांच्या या ट्वीटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली व त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकला 500 रुपयांचे चलानही मोबाइलवर पाठवण्यात आले आहे. 

Related Stories

मुंबई : इंटेरिअर डिझायनरवर अभिनेत्रीचा छेडछाडीचा आरोप, गुन्हा दाखल

Rohan_P

विक्की कौशल अन् कॅटरिना रिलेशनशिपमध्ये

Patil_p

पायाला दुखापत होऊनही सईने पूर्ण केले शुटिंग

Patil_p

अजिंक्य देव होणार बाजीप्रभू

Patil_p

येरे येरे पावसा चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव

Patil_p

आमिर खानच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!