तरुण भारत

मराठा मंदिर देणार युवकांना लष्करी प्रशिक्षण

रक्षक टेनिंग ऍकॅडमीचे उद्घाटन : गरजू युवकांना होणार लाभ

प्रतिनिधी / बेळगाव

युवकांना लष्करात जाणे सोयीचे होण्यासाठी बेळगावचे मराठा मंदिर पुढे सरसावले आहे. जिद्द, साहस व कर्तबगारी असूनही योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण नसल्यामुळे या तरुणांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन कर्नल मधू कदम यांच्या सहकार्याने बेळगावच्या मराठा मंदिर ट्रस्टने शिवजयंतीचे औचित्य साधून माळमारुती एक्सटेन्शन येथील मराठा वसतिगृह येथे रक्षक टेनिंग
ऍकॅडमीची सुरुवात केली आहे.

शुक्रवारी मराठा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते या टेनिंग ऍकॅडमीची सुरुवात करण्यात आली. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर ही ऍकॅडमी सुरू करण्यात आली आहे. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते या ऍकॅडमीचे उद्घाटन झाले. युवकांना लष्करी भरतीसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे, या हेतूने ऍकॅडमी सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू मुलांना याचा उपयोग होईल, असा विश्वास अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी व्यक्त केला.

सेपेटरी बाळासाहेब काकतकर प्रास्ताविकेत म्हणाले, तरुणांना देशसेवा करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. अशा तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांनी गोवावेस येथील मराठा मंदिर कार्यालयात आधारकार्डसह नावनोंदणी करावी, असे सांगितले.

प्रारंभी ज्येष्ठ संचालक नारायण खांडेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. ज्ये÷ संचालक नेताजी जाधव यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष नेमीनाथ कंग्राळकर, लक्ष्मणराव सैनूचे, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मण होनगेकर, विश्वास घोरपडे, अनंत लाड, दिनकर घोरपडे, डी. एम. ढोबळे, अजित सांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

फार्महाऊस फोडून सव्वालाखाच्या साहित्याची चोरी

Patil_p

लोखंड चोरीप्रकरणी चौकडीला अटक

Patil_p

आजपासून रात्रीची संचारबंदी

Omkar B

‘त्या’ जोडगोळीची कारागृहात रवानगी

Patil_p

आता बेळगाव – औरंगाबाद करता येणार हवाई प्रवास

Patil_p

दिवाळीच्या प्रकाशात कोरोनाचे संकट भस्मसात होईल

Patil_p
error: Content is protected !!