तरुण भारत

…म्हणून वॉरेन बफेट यांनी विकले सर्व सोने

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

जगातील टॉपच्या 10 श्रीमंतांपैकी एक आणि बर्कशायर हॅथवे कंपनीचे सीईओ वॉरेन बफेट यांनी सोन्यातील गुंतवणुकीत अपेक्षाभंग झाल्यानंतर आपले संपूर्ण सोने विकले आहे. रेग्युलेटरी फायलिंगला दिलेल्या माहितीनुसार, बर्कशायर हॅथवे या त्यांच्या कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या चौथ्या तिमाहीत सोने विकले.

मागील वर्षी उन्हाळय़ात बफेट यांनी सोने खरेदी केले तेव्हा सोन्याचा भाव प्रति औंस 2,065 डॉलर होता. सोन्याचा भाव प्रति औंस 1800 डॉलरपर्यंत खाली आल्यानंतर बफेट यांनी सोने विकले. त्यामुळे त्यांना सोने विक्रीत 12.8 टक्क्यांनी नुकसान झाले. बफेट यांचा पूर्वीपासूनच सोन्याबद्दलचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. 1998 साली त्यांनी एका भाषणात सोन्याला निरुपयोगी म्हटले होते.

Advertisements

बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशनमध्ये विकले शेअर्स
बफेट यांच्या कंपनीने कॅनेडियन मायनिंग कंपनीला बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशनमधील 31.7 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत.

Related Stories

चीन-रशिया भागिदारी ब्रिक्ससाठी हिताची

Patil_p

एकेकाळी मोलकरीण आता टीव्हीवर सूत्रसंचालिका

Patil_p

अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; 9 मुले जखमी

datta jadhav

20 वर्षांपासून गुहेत राहतो इसम

Patil_p

चीननेही केला अमेरिकेचा दूतावास बंद

Patil_p

बांगलादेशात सैन्याला पाचारण

tarunbharat
error: Content is protected !!