तरुण भारत

ग्रेटा थनबर्गकडून दिशा रवीची पाठराखण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर आंदोलक शेतकऱयांना पाठिंबा दर्शवणाऱया पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने प्रथमच भाष्य केले आहे. ग्रेटाने दिशाच्या अटकेवरून लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार असून कोणत्याही लोकशाहीचा हे मूलभूत अंग असायलाच हवेत, असे ट्विट करून ग्रेटाने दिशा रवी हिची पाठराखण केली आहे.

Advertisements

ग्रेटाने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली पोलिसांनी दिशा रवी या कार्यकर्तीला बेंगळूरमधील तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केले आहे.

Related Stories

‘कोव्होव्हॅक्स’ला डब्ल्यूएचओची मंजुरी

Patil_p

केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात वाढ

Amit Kulkarni

चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध

datta jadhav

भारतात मिळालेल्या कोरोनाच्या स्ट्रेनचे WHO ने केले नामकरण; दिले ‘हे’ नाव

Rohan_P

तटरक्षक दलाचा 45 वर्धापन दिन उत्साहात

Patil_p

यूपीत भाजपला झटका; आणखी एका मंत्र्याने दिला राजीनामा

datta jadhav
error: Content is protected !!