तरुण भारत

जिह्यात सलग दुसऱया दिवशी 23 नवे रुग्ण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम राहिली आह़े जिह्यात सलग दुसऱया दिवशी पुन्हा 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत़ चिपळूण तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिह्यात कोरोना बळींची संख्या 360 झाली आहे.  जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मागील 24 तासात  जिह्यात एकूण 23 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल़े यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरी तालुक्यातील 4, चिपळूण 3, खेड 11 व राजापूर तालुक्यातील 1 रुग्णांचा समावेश आह़े ऍन्टीजेन चाचणीत रत्नागिरीत 1 तर दापोलीत 3  कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 829 झाली आह़े  तीन रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून घरी सोडण्यात आल़े  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 294 झाली असून बरे होण्याचे प्रमाण 94.69 टक्के तर मृत्यूदर 3.66 झाला आह़े

Advertisements

Related Stories

जाचक शेतकरी कायदे रद्द करा

NIKHIL_N

घरकुलातही लाच, ग्रामसेवक ताब्यात

NIKHIL_N

घरातील 27 हजाराचे दागिने लंपास

Patil_p

देवाक काळजी रे ।। माझ्या देवाक..!

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची विक्रमी रुग्णवाढ

Patil_p

अंजली साळवी यांची भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी नेमणूक

Patil_p
error: Content is protected !!